नगर : घोड कालवा फुटला ; परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

संजय आ. काटे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

तालुक्यातून जाणारा घोडचा डावा कालवा आज सकाळी श्रीगोंदे साखर कारखान्याजवळ फुटला. यावळी शेतीचे माेठे नुकसान झाले.

श्रीगोंदे (नगर) : तालुक्यातुन जाणारा घोडचा डावा कालवा आज सकाळी श्रीगोंदे साखर कारखान्याजवळ फुटला. ज्या भागात हा कालवा फुटला तेथेच काल एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

दरम्यान, जलसंपदा विभागाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. श्रीगोंदे साखर कारखान्याजवळ घोडचा सतरा क्रमांकाची वितरीका आहे. कारखाना व मढेवडगाव या दरम्यान घोड कालव्यालगत असणारा रस्ता तुटल्याने हा कालवा फुटला. काल याच भागात नववीच्या वर्गात शिकणारा प्रमोद शिंदे नावाचा विद्यार्थी पाण्यात बुडून मृत झाला होता.

दरम्यान, या वितरीकेला गेट नसल्याने प्रमोदला वाचविता आले नाही. आज सकाळ ने तेथील वस्तुस्थिती छायाचित्रासह मांडली आहे. जलसंपदा विभागाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. 
आज सकाळी कालवा फुटल्याने आसपासच्या परिसरात पाणी गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ghod canal broke in shrigonda; Major loss of farmland in the area