दोन वर्षात 32 गावांना जिहे-कटापूरचे पाणी देणारच : गिरीश महाजन

Gihe and Katapurs water will provide to 32 villages in two years said Girish Mahajan
Gihe and Katapurs water will provide to 32 villages in two years said Girish Mahajan

दहिवडी : ''आगामी दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कटापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच'', असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माण - खटावमधून भाजपचाच आमदार होईल अन मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे तुमच्या मनासारखं होईल असेही ते म्हणाले.

जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजेनेद्वारे आंधळी धरणातून माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाणी देण्याच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर दहीवडी येथे आयोजित भाजपाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण मतदारसंघाचे प्रभारी सदाशिव खाडे, धैर्यशील कदम, भिमराव पाटील, भाजपाचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब खाडे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, नगराध्यक्ष दिलीपभाऊ जाधव, धीरज दवे, अर्जुन काळे, अरुण गोरे, अतुल जाधव, सुवर्णा साखरे, सोनिया गोरे, सुवर्णा पोरे, शिवाजीराव शिंदे,  बाळासाहेब खाडे, प्रदीप शेटे, विजय साबळे, सोमनाथ भोसले, सिद्धार्थ गुंडगे, बाबासाहेब हुलगे, वडूज, दहीवडी, म्हसवडचे नगरसेवक आणि दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले, ''देशाला आणि राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खटाव आणि माणचा दुष्काळ हटविण्यासाठी योजना आखली आहे. कामेही सुरु केली आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील 370 कलम हटवून एकसंघ भारताची कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळ लवकरच हटणार आहे. माण-खटावमधून तिकीट कुणाला द्यायचेय ते मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे असेही ते म्हणाले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, ''मला खासदार करताना जयकुमार गोरेंना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे. आज भूमिपूजन करण्यात आलेली पाणी योजना जयकुमार गोरेंनीच मांडली आणि त्यासाठी निधी मिळवून कामही सुरु केले. माणदेशी मातीचा स्वाभिमान जागृत ठेवत इथला दुष्काळ हटविण्यासाठी रात्रं-दिवस झटणारे जयाभाऊंचे नेतृत्व आता राज्यस्तरावर चमकणार'',असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुणाचं काहीही ठरलं असलं तरी आमचे जयकुमार गोरेंना लाखाच्या मताधिक्याने निवडून आणायचे ठरले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

माजी आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ''जनतेने माझ्यावर टाकलेली पाणी आणण्याची जाबाबदारी रात्रंदिवस प्रयत्न करुन मी पार पाडली आहे. उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यातील 97 गावांमध्ये पोहचले आहे. आज उत्तर माणच्या 32 आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांचा पाणीप्रश्न मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी मार्गी लावून ऐतिहासिक भेट दिली आहे. दोन तालुक्यातील काही वाजंत्री एकत्र आले आहेत. जयकुमारने काय केले असे ते विचारत आहेत.

माणचे प्रभारी सदाशिवराव खाडे, शिवाजीराव शिंदे यांनीही मनोगते व्यक्त करताना भाजप व जयकुमार गोरेंच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे अवाहन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com