जन्मशताब्दी वर्षात लोकशाहीर अण्णाभाऊंना "भारतरत्न' द्या...प्रसंगी आंदोलन आणि चळवळ उभी करण्याचा इशारा

घनशाम नवाथे
Wednesday, 29 July 2020

सांगली-   जगभरातील 29 देशात ज्यांचे साहित्य पोहोचले असे महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे देशात उपेक्षितच राहिले. यंदाच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, मुंबईत राष्ट्रीय स्मारक व्हावे आदी मागण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच प्रसंगी आंदोलन आणि चळवळ उभी करावी लागेल असा इशारा अण्णाभाऊंचे वारसदार सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

ते म्हणाले, ""अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक होते. अनेक स्वाभिमानी नायक आणि नायिका यांना त्यांनी साहित्यातून जगासमोर आणले. रशियासारख्या बलाढ्य देशात अण्णाभाऊंना मान-सन्मान मिळाला. परंतू हाच मान सन्मान महाराष्ट्रात मिळाला काय? याचा विचार करण्याची गरज आहे. अण्णाभाऊंचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊंची कर्मभूमी असलेल्या मुंबईत राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा झाली. त्यासाठी शंभर कोटी रूपये देण्याचे शासनाने जाहीर केले. परंतू ही घोषणा होती की उपेक्षा होती? हे समजत नाही. अण्णाभाऊंचे जन्मभूमी असलेल्या सांगलीत त्यांच्या उंचीला शोभणारे स्मारक झाले पाहिजे. त्यांच्या नावाचे महामंडळ गेली सहा वर्षे बंद आहे. गेली अनेक वर्षे उपेक्षाच होत असून ती जन्मशताब्दी वर्षात तरी थांबेल काय? असा आमचा सवाल आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला पाहिजे. आजवर दलित साहित्यिक म्हणून ते उपेक्षित राहिले आहेत. परंतू आता आमच्या भावनांचा उद्रेक होऊ नये यासाठी शासनाने प्रलंबित मागण्यांचा विचार केला पाहिजे. अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत. जगभरातील 29 देशात ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो, त्या अण्णाभाऊंना दलित म्हणून आजवर शासनाने उपेक्षित ठेवले आहे. परंतू आता प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या नाहीतर लॉकडाउननंतर आम्हाला आंदोलन आणि चळवळ उभी करावी लागेल.'' 
अण्णाभाऊंच्या वारसदार सावित्री साठे, जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आकाश तिवडे, मातंग समाजाचे नेते प्रा. राम कांबळे, पुतळा समिती अध्यक्ष सॅमसन तिवडे, सतीश मोहिते आदी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give 'Bharat Ratna' to Lokshahir Annabhau in the centenary year of birth . A warning to start a movement on the occasion