दूध दर फरक रक्कमेवर द्या; पालकमंत्री जयंत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

केंद्राच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेअंतर्गत बसवलेल्या 84.00 लाख रुपये किंमतीचा मिल्को स्कॅनचे उद्‌घाटन झाले. 

इस्लामपूर (सांगली) ः राजारामबापू दूध संघाने दूध उत्पादकांना प्रती लिटर प्रमाणे दूध दर फरक अदा न करता दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थाना पुरविलेल्या दूधाच्या रक्कमेवर टक्केवारी नुसार दूध दर फरक अदा करावा, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. केंद्राच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेअंतर्गत बसवलेल्या 84.00 लाख रुपये किंमतीचा मिल्को स्कॅनचे उद्‌घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. 

मंत्री श्री. पाटील म्हणाले,""मिल्को स्कॅनचा 100 टक्के वापर करावा. संकलित दुधाची गुणवत्ता 100 टक्के तपासून घ्यावी.'' खासदार श्री. माने म्हणाले,""मंत्री पाटील यांच्या सर्वच संस्था विकासाभिमुख समाजहितासाठी कार्यरत आहेत.'' अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले,""राजारामबापू दूध संघास महासंघाचे संचालक व कार्यकारी संचालक तसेच केंद्रीय पशूसंवर्धन व डेअरी विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी, केंद्रीय पशुसंवर्धन व डेअरी विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार मिहीलकुमार सिंग व उपमन्यु बसू, पशुसंवर्धन व डेअरी विभागाचे सचिव अनुप कुमार यांचे सहकार्य लाभले. मिल्कोस्कॅनमुळे दूधाच्या 28 तपासण्या 30 सेकंदात करता येणे शक्‍य होईल. 14 नैसर्गिक घटकांची तपासणी व भेसळ ओळखता येते.'' 

राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष शामराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती विश्वासराव पाटील, सुहास पाटील, उदय पाटील, विलासराव पाटील, संग्राम फडतरे, बाळासाहेब पाटील, पोपटराव जगताप, अल्लाउद्दीन चौगुले, रमेश पाटील, विकास कांबळे, उज्वला पाटील, मंगल बाबर, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी, पी. डी. साळुंखे उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी आभार यांनी मानले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give a different amount of milk rate; Guardian Minister Jayant Patil