माणदेशी खिलार-बोकडांना द्या जीआय मानांकन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

आटपाडी : माणदेशी खिलार आणि बोकड-बकऱ्यांना जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

आटपाडी : माणदेशी खिलार आणि बोकड-बकऱ्यांना जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

 

खिलार जनावरे आटपाडी तालुक्‍याची ओळख आहे. उत्कृष्ट, चपळ, देखणे ,मजबूत, भारदस्त बांध्याचे खिलार खोंड शर्यंतीसाठी ओळखले जाते. त्याबरोबरच चव, गुणवत्तेने आटपाडीच्या बकरी-बोकडांचीही ओळख आहे. या भागात ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. इथल्या मटनाची ही चव न्यारी आहे. माणदेशची ओळख असलेल्या या जनावरांना जीआय मानांकन मिळावे. या जनावरांना राज्यभरातून विशेष मागणी असते उत्कृष्ट देशी वाण म्हणून खिलार गाई , बैल , खोंडाना संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. आजच्या मार्केटींगच्या युगात इतके दर्जेदार छोट्या जनावरांचे (बोकडे बकरे वगैरे ) मटन देणारे आणि दमदार शेळ्या,मेंढ्या, बोकड,बकरे या लहान जनावरांचे आगर असणारे हे क्षेत्र स्पर्धेत मागे पडले आहे. अशी ओळख मिळाल्यास इथल्या शेतकरी, पशुपालकांना आधार मिळेल. त्यांचे मार्केटिग आपोआपच होईल. सरकारच्या लेखी हे पशुसंवर्धन आहे. त्यामुळे याला शेतमाल मानायचा की पशुधन मानायचे . जी आय मानांकन मागायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला असावा . महाराष्ट्र शासनाने या बाबीला गांभीर्याने घेऊन कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने मानांकन मिळावे.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give GI rating to Mandeshi Khilar-Bokdas