esakal | समाजाला धीर व आधार द्या : जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Give support to the society: Jayant Patil's appeal to the workers

जवळची माणसं जाताना पाहून जीव तुटतो. स्वतः व कुटुंबाची काळजी घ्या. समाजाला धीर व आधार द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 

समाजाला धीर व आधार द्या : जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : जवळची माणसं जाताना पाहून जीव तुटतो. स्वतः व कुटुंबाची काळजी घ्या. समाजाला धीर व आधार द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 

त्यांनी राजारामनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला राष्ट्रवादी व शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकार्त्यांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, ऍड. चिमण डांगे, महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सुस्मिता जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील, सभापती ऍड. विश्वासराव पाटील उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले,""कार्यकर्त्यांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत समाजात जागृतीस वेळ द्यावा. आजार अंगावर काढू नका. लवकर उपचार केल्यास निश्‍चित बरे होऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवा. व्यायामास वेळ द्या. भिऊ नका, असे सांगा. जे बरे होवून घरी आलेत, त्यांनाही धीर द्या.'' 

तालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर, नगरसेविका सुनीता सपकाळ, उषा मोरे, मेघा पाटील, कमल पाटील, शैलजा जाधव, मनीषा पाटील, माया जाधव, उदय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढावा घेताना सूचना केल्या. 
राज्य चिटणीस भीमराव पाटील, अरुण कांबळे, आनंदराव पाटील, वैभव पाटील, दादासो मोरे, प्रशांत पाटील, भास्कर पाटील, प्रकाश कांबळे, सुवर्णा जाधव, पुष्पलता खरात, सुनंदा साठे उपस्थित होते. 

नगरसेविकेची कैफीयत 

नगरसेविका श्रीमती सुनीता सपकाळ म्हणाल्या,""प्रभागातील नागरिकांना शक्‍य तेवढे सहकार्य व मदत केली. मी व कुटुंबातील सदस्य पॉझिटीव्ह आलो. तेंव्हा लोक कामे सांगत. मात्र तब्येतीची चौकशी केली नाही. तेंव्हा वाईट वाटले. त्यांची कैफियत व त्यांनी सांगितलेला किस्सा ऐकून "कोरोनाने माणुसकी कमी केली' अशी भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. 

संपादन : युवराज यादव