त्यांना मिरज शहराकडे लक्ष देण्याची सबुद्धी देवो...

Give them the wisdom to pay attention to the city of Miraj ...
Give them the wisdom to pay attention to the city of Miraj ...
Updated on: 

मिरज : शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आमदार सुरेश खाडे यांनी केला आहे. शहरात अनेक समस्या आहेत. मात्र, आमदारांचे लक्ष नाही. "पांडुरंग' त्यांना शहराकडे लक्ष देण्याची सबुद्धी देवो म्हणून श्री. खाडे यांच्या कार्यालयासमोर मिरज शहर सुधार समितीच्यावतीने बुधवारी (ता. 24) रोजी आंदोलन करून साकडे घालण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 80 टक्के काम आठ वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. श्री. खाडे सोमवारी काम सुरू होणार असल्याचे सांगताहेत. मात्र, कोणता सोमवार याबाबत स्पष्टता हवी. शहरातील रुंदीकरण वर्षांपासून रखडल्याने बकाल स्वरूप आले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी सुरू केलेल्या दीडशे कोटींच्या अमृत योजनेचा सुध्दा बोजवारा उडाला. 

अनेक ठिकाणी पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेविकेला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे लागले होते. लोकप्रतिनिधी म्हणून 11 वर्षांत स्थानिक राजकारण जपण्यासाठी खाडे यांनी मिरज शहरातील समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खाडेंना जाब विचारण्यास मिरज सुधार समितीने बुधवारी (ता. 24) सकाळी 10 वाजता खाडे यांच्या कार्यालयासमोर भजन आंदोलन करून पांडुरंगाला साकडे घातले जाणार आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com