आम्हालाही द्या पॅकेज.... कुणी केली मागणी

Give us the package too.... demanded  Hoteliers
Give us the package too.... demanded Hoteliers
Updated on

इस्लामपूर : हॉटेल व्यावसायिकांना 2020 व 2021 या वर्षाचे सर्व कर माफ करुन विशेष पॅकेज द्यावे, अशा मागणीचे निवेदन वाळवा तालुका हॉटेल्स असोसिएशनतर्फे जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, "कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे या उद्योगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. हॉटेल क्षेत्राला औद्योगिक प्रमाणे कर न लागता इतर व्यवसायाप्रमाणे कर लावला जातो. वीज, पालिका कर हा व्यावसायिक स्वरूपातच आहे. कोरोनामुळे हॉटेलमधील कामगारांचे स्थलांतर झाले आहे. कर्मचाऱ्यांनी तीन ते पाच महिन्याचे वेतन ऍडव्हान्स दिले जाते. परप्रांतीय कर्मचारी परत येईल याची शाश्‍वती अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता व्यवसाय स्थिरावण्यासाठी सात आठ महिन्यांचा कालावधी लागेल.

अनेक व्यावसायिकांनी बॅंका, पतसंस्थांचे कर्ज घेतले आहे. थकीत कर्जे, वीज बिल, पालिका कर हे सर्व 2020 व 2021 या वर्षात संपूर्ण माफ व्हावे. केंद्र शासनाने इतर उद्योगांना अडचणीच्या काळात अनेक पॅकेज दिली आहेत. त्याप्रमाणे या व्यवसायाला जीवंत ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज देऊन मदत करावी.' यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कांबळे यांनी व्यावसायिकांच्या अडचणी सांगितल्या. ते म्हणाले, "" एसटीमध्ये एक सीट एक प्रवासी या प्रमाणे हॉटेलमध्ये एक टेबल एक ग्राहक या पद्धतीने हॉटेलला परवानगी द्यावी.'' 

राज्य शासनाची भूमिका या व्यवसायाबाबत सकारात्मक आहे. आपल्या मागणीचा निश्‍चित पाठपुरावा असे आश्‍वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले. सईद मोमीन, धनराज पाटील, विनायक जौंजाळ, बंडा तांदळे, अशोक सिरवी, सुरेश बारपटे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com