Sangli News : सांगलीचे ४५ जण एकाच वेळी ‘आयर्नमॅन’

रिलेत स्वप्नील बसागरे याने एका हाताने केली ९० किलोमीटर सायकलिंग
goa ironman 70 3 award to 45 sangli players 90 km cycling marathi news
goa ironman 70 3 award to 45 sangli players 90 km cycling marathi newsSakal

सांगली : गोवा आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा सांगलीकरांनी गाजवली. ५० देशांतील हजारांवर स्पर्धकांमधून ४५ जणांनी आर्यनमॅन किताब पटकावला. वैयक्तिक व रिले प्रकारात ही कामगिरी केली. रिलेत स्वप्नील बसागरेने एका हाताने ९० किलोमीटर सायकलिंग करत स्पर्धा वेळेत पूर्ण केली.

गोवा येथील मीरामार बीचवर रविवारी (ता. ८) स्पर्धा झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. बंगळूर येथील ‘योस्का’ने आयोजन केले होते. सांगलीतील ॲम्बिशियस एन्ड्युरन्स क्लबच्या ४९ सदस्यांनी सहभाग नोंदविला.

वैयक्तिक प्रकारात ८०० तर, रिले प्रकारात १३० संघ सहभागी झाले. समुद्रात १९०० मीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर धावणे हे अंतर साडेआठ तासांत पूर्ण करायचे होते. सांगलीच्या ४५ जणांनी स्पर्धा पूर्ण केली.

आयर्नमॅन किरण साहू यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले. तिघांना स्पर्धा पूर्ण करता आली नाही. विजेत्यांना आयर्नमॅनचे पदक देण्यात आले. आयर्नमॅन विजेते (कंसात पोहणे, सायकलिंग, धावण्याची वेळ) - वैयक्तिक : डॉ. सुभाष पाटील (७:०३:२७), चिन्मय गोरे (७:०३:५०), नेमिनाथ पाटील (७:२५:१८), नीतेश बसागरे (७:२६:४६), प्रशिक्षक किरण साहू (७:२९:४२),

आदित्य कपिलेश्वर (७:४६:५३), राहुल साठे (७:५३:०५), विनोद खोत (७:५८:०३), अमर पाटील (७:५९:५८), प्रेम राठोड (८:००:५२), प्रवीण मोहनानी (८:०५:४८), केदार केळकर (८:१४:५०), संदीप पाटील (८:१७:४६), आदित्य बावडेकर (८:२०:१७), सौरभ शिंदे (८:२८:२६), इशा शहा (७:१६.००), डॉ. आरती परांजपे (७:५९:०५).

रिले : दीपक माळी, अक्षय आवटी, प्रसन्ना करंदीकर (विलो प्रो संघ - ६:२४:४८), अमित सोनवणे, गणेश चौंदीकर, उस्मान बाणदार (सायक्लोथॉन - ६:५०:२८), श्रीशेल, डॉ. प्रकाश पवार, श्रीशेल (एईसी मिरज स्ट्रायकर्स - ७:२२:५५), शीतल नवले, नीलेश भोसले, हेमंत पाटील (एईसी एफ थ्री - ७:२३:११), अस्लम मुरसल, अतीश अग्रवाल,

डॉ. रियाज मुजावर (गुड मॉर्निंग - ७:२९:०५), देवदत्त फडके, डॉ. हर्षल कुलकर्णी, डॉ. आकाश कटकमवार (आयएमए, मिरज - ७:३०:२३), प्रसाद दीक्षित, स्वप्नील बसागरे, प्रसाद दीक्षित (एईसी रिले टीम - ८:०२:४५), डॉ. अरुण सरडे, गौरी दुकाने, डॉ. अंजली धुमाळ (एईसी रिले मिक्स - ८:१६:१२), नानासाहेब पाटील, प्रकाश येलपले, अमित शिरगुप्पे (टीम एईसी चॅम्प - ८:२१:४३), कीर्ती प्रकाश, श्यामकुमार जाधव, धवल मगदूम (टीम केएसडी - ८:१७:१४).

goa ironman 70 3 award to 45 sangli players 90 km cycling marathi news
Sangli Railway Platform : सांगली रेल्वे प्लॅटफॉर्मला अखेर मुहूर्त

स्पर्धेत इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच यश मिळाले. फिटनेसबाबत जागृती व आयर्नमॅनची क्रेझ वाढत आहे. वर्षभरापासून तयारी सुरू होती. ५० देशातील स्पर्धकांच्या तुलनेत स्पर्धेतील सहभाग व सर्वसाधारण विजेता संघ सांगलीचा याचा अभिमान आहे.

-किरण साहू, प्रशिक्षक, ॲम्बिशियस एन्ड्युरन्स क्लब, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com