बेळगावमधील 'या' सात प्रसिद्ध धबधब्यांना भेट देणार असाल, तर थांबा! वन विभागानं जारी केलाय प्रवेश बंदीचा आदेश

बेळगाव जिल्ह्यातील सात धबधब्यांवर पर्यटकांना बंदीचे आदेश वन विभागाकडून नुकताच बजाविले आहेत.
Gokak Waterfall
Gokak Waterfallesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रात पश्चिमघाट पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

बेळगाव : जिल्ह्यातील सात धबधब्यांवर पर्यटकांना बंदीचे आदेश वन विभागाकडून नुकताच बजाविले आहेत. आता गोकाक धबधब्याची भर पडली आहे. जिल्हापोलिस प्रमुख भिमाशंकर गुळेद यांनी आज याबाबत आदेश बजावत गोकाक धबधब्याच्या परिसरात जाण्यास बंदी घातल्याचे कळविले आहे.

पर्यटकांची सुरक्षा आणि खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यातील सात ठिकाणी पर्यटकांना बंदीचे आदेश यापूर्वी बजाविले आहेत. मात्र, आता महाराष्ट्रात पश्चिमघाट पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खानापूर तालुक्यातील सात धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे निसर्गसौदर्य, वर्षा पर्यटन आणि धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत.

Gokak Waterfall
जोतिबा डोंगरावरील देवस्‍थानची तब्बल 150 एकर जमीन खासगी ठेकेदाराला दिली; करार रद्दसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही, असा दावा करत धबधब्याच्या परिसरात जाण्यावर निर्बंधचे आदेश वन विभागाकडून जारी केले आहेत. गोकाक धबधबा परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केला आहे. गोकाक धबधब्याची पाण्याची पातळी वाढली आहे. संततधार पाऊस असाच सुरू राहिल्यास अधिक धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे निर्बंध जारी केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.