Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'कडून सीमाभागांत म्हैस, गाय दूध दरात कपात; दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र संताप

बेळगाव (Belgaum) तालुक्यातील जवळपास ७० गावांतील शेतकरी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाला दूधपुरवठा करतात.
Gokul Dudh Sangh Kolhapur
Gokul Dudh Sangh Kolhapuresakal
Summary

आतापर्यंत महाराष्ट्रातील दराप्रमाणे सीमाभागातील शेतकऱ्यांना दर मिळत होता; पण तीन दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघाने पत्रक पाठवून दर कमी करण्यात आले आहेत.

कंग्राळी खुर्द : गोकुळ दूध संघाकडून (Gokul Dudh Sangh Kolhapur) सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून, महाराष्ट्रील दूध दराच्या तुलनेने म्हैस दूध (Buffalo Milk) दरात दोन रुपये कपात केली आहे. तर गायीच्या दूध (Cow Milk) दरात तब्बल साडेचार रुपये कपात केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बेळगाव (Belgaum) तालुक्यातील जवळपास ७० गावांतील शेतकरी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाला दूधपुरवठा करतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील दराप्रमाणे सीमाभागातील शेतकऱ्यांना दर मिळत होता; पण तीन दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघाने पत्रक पाठवून दर कमी करण्यात आले आहेत, असे कळविले आहे. त्यामुळे सीमाभागातील दूध उत्पादक शेतकरी व संकलन केंद्राच्या संचालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Gokul Dudh Sangh Kolhapur
कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप लटकलेलंच; मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेचं काय झालं?

तसेच शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० वाजता अलतगा (ता. बेळगाव) येथील गोकुळ संघाच्या एकत्रीकरण केंद्रांवर ७० गावांतील दूध उत्पादक मोर्चा काढला जाणार असल्याचे गोकुळ दूध संघाला कळविले आहे. तसेच त्या दिवशी गोकुळ संघाच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी व संचालकांना चर्चेसाठी बोलावले आहे. तरी सीमाभागातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अलतगा येथे सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहनही सीमावर्ती भागातील दूध संकलन केंद्राच्या संचालकांनी केले आहे.

Gokul Dudh Sangh Kolhapur
Kalasa-Banduri Scheme : तब्बल 26.96 हेक्टर वनजमीन हस्तांतराचा प्रस्ताव फेटाळला; कर्नाटकाला मोठा दणका

महाराष्ट्र शासन नेहमी सीमाभागातील जनतेच्या पाठीशी आहोत, असे जाहीर करते. शेतकऱ्यांना असा दुजाभाव का, याचे कारण काय, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच दर द्यावा. अन्यथा, दूध दरासाठी तीव्र आंदोलन करू.

- प्रशांत पाटील, अध्यक्ष, बाल हनुमान दूध संघ, कंग्राळी खुर्द.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com