सोने तारण कर्जाला आली झळाळी...तोळ्याला 34 हजारापर्यंत कर्ज; व्याजदर घसरल्याने सुवर्णसंधीच

घनशाम नवाथे
Tuesday, 28 July 2020

सांगली-  "लॉकडाउन' काळात सोने दराला झळाळी आली असून सोन्यावर कर्ज काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे लॉकडाउनपूर्वी प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोने गहाण ठेवल्यास 24 हजार रुपये कर्ज मिळत होते. ते आता 34 हजार रुपयापर्यंत मिळू लागले आहे. तसेच लॉकडाउनपूर्वीचा सोने तारण कर्जाचा व्याजदर देखील 11.50 टक्केवरून 9.50 ते 8.50 टक्केपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागत आहे.

सांगली-  "लॉकडाउन' काळात सोने दराला झळाळी आली असून सोन्यावर कर्ज काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे लॉकडाउनपूर्वी प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोने गहाण ठेवल्यास 24 हजार रुपये कर्ज मिळत होते. ते आता 34 हजार रुपयापर्यंत मिळू लागले आहे. तसेच लॉकडाउनपूर्वीचा सोने तारण कर्जाचा व्याजदर देखील 11.50 टक्केवरून 9.50 ते 8.50 टक्केपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागत आहे.

लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. काहींच्या पगाराला 50 टक्केपर्यंत कात्री लागली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी बॅंकांचा दरवाजा ठोठावून वैयक्तिक कर्ज काढणे परवडणारे नाही. तसेच सावकारापुढे पैशाची मागणी करणे धोकादायक आहे. त्यामुळे सोने तारण कर्जाच्या रूपाने जादा कर्ज काढण्याची संधी सोन्याच्या दरवाढीने निर्माण झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात अनेकांनी सोने तारण कर्जाचा लाभ घेतला आहे. लॉकडाउनपूर्वी सोन्याचा दर कमी असल्यामुळे प्रतितोळा 24 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळत होते. परंतु सोन्याच्या दराने 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्यावर मिळणाऱ्या कर्जाने देखील मर्यादा ओलांडली आहे. सध्या बॅंका वेगवेगळा दर आकारून सोने तारणावर कर्ज देत आहेत. 

काही सहकारी बॅंकांनी सोने तारण कर्जाचा व्याजदर 8.5 टक्केपर्यंत कमी केला आहे. कर्जासाठी सर्व प्रक्रिया बॅंकच पार पाडत असून प्रति तोळा 27 हजार रुपये कर्ज देत आहेत. तर काही बॅंकांनी व्याजदर 9.5 टक्केपर्यंत करून कर्ज 34 हजार रुपयेपर्यंत देण्यास सुरवात केली आहे. ओळखीचा पुरावा, पॅनकार्ड, आधारकार्ड अशा मोजक्‍याच कागदपत्रांच्या आधारे काही मिनिटात बॅंका सोन्यावर कर्ज देत आहेत. लॉकडाउनपूर्वी सोने तारण कर्जाचा व्याजदर 11.50 टक्केपर्यंत होता. सध्या तो 8.5 टक्केपर्यंत घसरला आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
चोख 22 कॅरेटच्या एक तोळा सोन्याला 34 हजार रुपये कर्ज मिळत असून त्यातून सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांची तातडीची निकड पूर्ण होऊ शकते. तसेच बॅंकांना देखील कर्ज बुडीत जाण्याचा कोणताच धोका नसल्यामुळे सोने तारणसाठी त्या तत्काळ कर्ज देतात ही वस्तुस्थिती आहे. लॉकडाउन काळात "एसबीआय' सारख्या बॅंकेने तर शेतकऱ्यांना देखील सोन्यावर कर्ज देण्याची सुविधा आणली आहे. इतर बॅंका सोन्यावर दोन लाखापर्यंत कर्ज देत असताना काहींनी 20 लाखांपर्यंत मर्यादा वाढवली आहे. 

परतफेडीसाठी अटी 
सोने तारणावर दोन लाखापर्यंतच्या कर्जासाठी वर्षाची मुदत आहे. मुदत वाढवता देखील येते. दोन लाखावरील कर्जासाठी ईएमआय ची सुविधा आहे. ईएमआयचे तीन हप्ते थकले तर कर्ज "एनपीए'मध्ये जाऊ शकते. काही बॅंकांनी कर्जाच्या रकमेवर व्याज आणि मुदत याचे गणित घातले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold mortgage loan has been slashed . Loan up to Rs 34,000; A golden opportunity due to falling interest rates