घर असावे तर असे ; जुन्या शैलीतील डौलदार सरोज बंगला

Good Look for old Home in Klhapur.gif
Good Look for old Home in Klhapur.gif
Updated on

साईक्‍स एक्‍स्टेंशन म्हणजे राजारामपुरीचा विस्तारित भाग. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर साईक्‍स याचे नाव या परिसराला दिलेले. त्याच्याच नावाने सध्याचे बीटी कॉलेज म्हणजे त्यावेळेचे साईक्‍स लॉ कॉलेज. हा परिसर म्हणजे उच्चभ्रु वस्तीचा. एक घर दुसऱ्यापेक्षा देखणे. रस्त्यावर दुतर्फा झाडी. घराभोवती विस्तीर्ण आवार. या वातावरणाला साजेसा या परिसरात व्ही. टी. पाटील यांचा बंगला. नगराध्यक्ष, आमदार, खासदार, शिक्षणतज्ज्ञ अशा या व्ही. टी पाटलांचा बंगला त्यांच्या नावलौकिकाला साजेसाच.

त्यांच्या बंगल्याचे नाव सरोज. बंगला तीन मजली. पूर्ण दगडी बांधणीचा. तळघरही असलेला. रचना डौलदार. आणि आवारामध्ये हिरवीगार झाडी. बघताक्षणी पहात राहावा, अशी या बंगल्याची बांधणी. दरवाजाला दगडी कमान. हळूच वळण घेतलेल्या दगडी पायऱ्या. त्याच्याशेजारीच छान तुळशीवृंदावन. आणि खांबावर पेललेल्या पोर्चमधून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सागवानी दणदणीत जीना. बंगल्याला खिडक्‍या 34. त्यामुळे हवा आणि प्रकाश सर्वत्र कायम भरून राहिलेला. पंखा लावायची तर कधी गरजच नाही.

व्ही. टी. पाटील हे व्यक्तिमत्व सार्वजनिक असल्यामुळे या बंगल्यात कायमच वर्दळ राहिली. या शिवाय तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बैठकाही याच बंगल्यात व्हायच्या. त्यामुळे या बंगल्याचा दबदबाही कायम राहिला. त्या बंगल्याच्या मागे चांगली बांधीव विहीर होती. पाण्याने सतत भरलेली होती. पण1987 साली एका भूकंपाच्या धक्‍क्‍याचे निमित्त ठरले आणि विहिरीचे पाणी गायब झाले. आज विहीर आहे. पण पाणी खूप कमी आहे. या बंगल्या भोवतालच्या जागेत आंब्याची झाडे होती. आंब्याची बाग म्हणूनच ओळखली जात होती. पाटील यांनी सरोजनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाला हा बंगला दिला. नंतर तेथे स्वयंसिद्धाचे कार्यालय झाले. त्यानिमित्ताने बंगल्यातील वर्दळ कायम राहिली. काळाच्या ओघात या बंगल्याभोवतीच्या मोकळ्या जागेत अपार्टमेंट उभी राहिली. हॉल उभा राहिला पण हा मूळ देखणा बंगला उरलेल्या मोकळ्या जागेतून कायम डोकावताच राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com