सहकारमंत्री म्हणाले, दोन लाखांवरील कर्जदारांसाठीही लवकरच गुड न्यूज 

सहकारमंत्री म्हणाले, दोन लाखांवरील कर्जदारांसाठीही लवकरच गुड न्यूज 
Updated on

नगर : राज्यातील तीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्या कर्जापोटी 29 लाख 700 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कर्जमाफीचे 98 टक्के काम पूर्ण झाले अाहे. 21 फेब्रुवारीपर्यंत याद्या जाहीर होतील. दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी केलेली अाहे. दोन लाखांच्या पुढे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त ते आज नगर येथे आले होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर आदी उपस्थित होते.

एकदम सोपी पद्धत

पाटील म्हणाले, ""शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल अडचण होऊ नये यासाठी अतिशय सोपी व सुलभ पद्धत केली आहे. त्याचा बॅंकांनाही आता त्रास होणार नाही. दोन लाखांच्या पुढे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांबाबत लवकरच निर्णय होईल. या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, मी, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा समावेश आहे.

कर्जवसुलीचाही प्रयत्न

समितीच्या दोन बैठका नुकत्याच झाल्या. त्यात या विषयांवर चर्चा झाली. लवकरच निर्णय घेतला जाईल.'' 
अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे नागरी बॅंका, तसेच पतसंस्थांचा विषय यामध्ये आहे, असे सांगून पाटील म्हणाले, की अनेक संस्थांमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ते पैसे मिळविण्यासाठी संबंधित संस्थांवर प्रशासक नेमून कर्जवसुलीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातून संस्था टिकेल आणि ठेवीदारांचे पैसेही मिळतील.

 
सहकाराचा वापर राजकारणासाठी नको 
पाटील म्हणाले, ""मागील सरकारच्या काळात सहकारक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. ती निश्‍चितपणे दूर केली जाईल. सरकार प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहील; मात्र सहकाराचा राजकारणासाठी कोणीही उपयोग करू नये.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli land acquisition objections by farmers
Tukaram Mundhe’s Crackdown on Food Quality Violations
Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Marathi News Esakal
www.esakal.com