खुषखबर : पंतप्रधान जनधनचे पाचशे रूपये आता घरपोहोच...राज्यात पहिला उपक्रम 

post logo.jpg
post logo.jpg
Updated on

सांगली- कोरोना पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये तसेच बॅंकांमधील गर्दी टाळण्यासाठी पोस्टामार्फत तसेच पोस्टमन मार्फत घरपोच लोकांना बॅंक खात्यावरील पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुविधेचा उपयोग करण्यात येत असून 2 ते 21 एप्रिल कालावधीत जिल्ह्यातील 10 हजार 151 नागरिकांनी योजनेचा लाभ घेऊन आधार एनेब्लड पेमेंट सिस्टीमद्वारे 1 कोटी 41 लाख 58 हजार 136 रुपये खात्यावरून काढली आहे. अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पोस्ट विभागाचे कौतुक केले आहे. 


बॅंकामधून रक्कम काढण्यासाठी लोक गर्दी करत होते त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होताच ती काढण्यासाठी बॅंकांमध्ये लोक रांगा लावून गर्दी करत असल्याचे निदर्शनास येताच पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक मार्फत एईपीएस सुविधेद्वारे नागरिकांना स्वत:च्या कोणत्याही बॅंक खात्यावरील रक्कम गावातील पोस्ट ऑफिस तसेच पोस्टमन मार्फत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

योजनेचा यासाठी बॅंक खात्याला आधारकार्ड लिंक असणे आवश्‍यक आहे. नागरिक पोस्ट पेमेंट बॅंकचा ग्राहक असला किंवा नसला तरी त्याला त्याचा लाभ घेता येईल. पैसे काढण्यासाठी फक्त आधार आणि मोबाईल क्रमांक आवश्‍यक आहे. ग्राहकांचा फक्त आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करून ते पैसे काढू शकतात. गावातील पोस्टमन त्याच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या रकमेनुसार ही सुविधा देऊ शकेल त्यासाठी फोनवरून त्यांना संपर्क करून आपल्या घरी बोलवू शकता किंवा शक्‍य असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्यवहार करू शकता. 

"माझ्या खात्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम जनधन खात्यात 500 रुपये जमा झाले होते. लॉकडाऊनमुळे ही रक्कम मला काढता येत नव्हती. पोस्टमनकडे मी तशी मागणी केल्यानंतर मला पोस्टाद्वारे घरपोच पैसे मिळाले. या योजनेचा इतरांनीही लाभ घ्यावा. 
अश्विनी संतोष शिर्के, (रा. संजयनगर, सांगली) 

 

 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com