आनंदाची बातमी ः  कवठेमहांकाळ तालुक्‍यात पेरणी पूर्ण 

KVM20A01973_pr.jpg
KVM20A01973_pr.jpg

कवठेमहांकाळ (सांगली) : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे संकट वाढत चालले असताना दुसरीकडे मान्सूनच्या पावसाने कवठेमहांकाळ तालुक्‍यात दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या पावसावर तालुक्‍यातील खरीप हंगामाची 93.13 टक्के पेरणी पूर्ण झाली. मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

मात्र कोरोनाच्या धास्तीने शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात 60 गावांचा समावेश आहे. तालुक्‍यात खरीप हंगामाचे 22419 आहे. त्यापैकी 20916 हेक्‍टरवर खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली. यंदा मान्सून पाऊस चांगला असल्याचे हवामान खात्याने वर्तवली यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर खरीप हंगामाची पेरणी उरकून घेतली आहे.

हंगामातील खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी झाली आहे. तालुक्‍याचा पूर्व विभागातील ढालगाव, नागज, लंगरपेठ घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली पश्‍चिम विभागातील शिरढोण, बोरगाव, देशीग, रांजणी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली.

तालुक्‍यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली असली तरी तालुक्‍यातील शेतकरी वर्गाचे सर्वसामान्य नागरिकांनाही प्रशासनाला सहकार्य केले आहे. तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हंगामातील बियाणे वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांनीही यंदाचा खरीप हंगाम हाती लागण्याची आशा आहे. तालुक्‍यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली आहे. 

खरीप हंगामातील क्षेत्र हेक्‍टर : 22419 
पेरणी पूर्ण झालेले हंगामाचे क्षेत्र : 20916 हेक्‍टर 
खरीप हंगामाची टक्केवारी - 93.13 
--------- 
(दिनांक 06 जुलै 2020 अखेर) 
पिकाचे नाव. क्षेत्र पेरणी क्षेत्र 
खरीप ज्वारी 5398 2204 
बाजरी 8053 7094 
मका 4672 6434 
तूर 347 142 
उडीद 720 3010 
मूग 470 375 
इतर कडधान्य 1302 813 
भुईमूग 706 796 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com