
संख : जत पूर्व भागात डाळिंबाला सरासरी प्रतिकिलो १२३ ते १२५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. गेल्या आठ दिवसांच्या पाठीमागे डाळिंबाचा ५० ते ६० रुपये दर घसरला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सध्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.