'वंचित'चा मोठा चेहरा भाजपच्या गळाला; दसऱ्याआधीच सिमोल्लंघन

सागर आव्हाड
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पडळकर हे येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाबद्दल विविध तर्क लढविण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पडळकर काय करणार याबद्दल उत्सुकता होती. तो निर्णय़ त्यांनी आता घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील जत किंवा खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते गोपीचंद पडळकर यांचा भाजप प्रवेश अखेर आज (मंगळवार) ठरला. दसऱ्यापूर्वीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून, जत किंवा खानापूर या मतदारसंघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

पडळकर हे येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाबद्दल विविध तर्क लढविण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पडळकर काय करणार याबद्दल उत्सुकता होती. तो निर्णय़ त्यांनी आता घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील जत किंवा खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार म्हणून त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात रंगत आणली होती. 'वंचित'ला चांगला चेहरा मिळाला, अशी चर्चा ही सुरू झाली. मात्र 'वंचित'पासून गोपीचंद कधी वंचित झाले हे कळालेच नाही. पडळकर यांच्यासारखा चेहरा सोबत घेतला म्हणून लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करत 'वंचित'ला निरोप घेतला होता. आता पडळकरही आंबेडकर यांच्यापासून दूर झाले. पश्चिम महाराष्ट्रात वंचितचे मेळावे झाले. त्यात ते सहभागी झाले नाहीत. ते पुढे काय करणार, याबाबत चर्चा झडू लागल्या. ते सांगोल्यातून उभे राहणार. गणपतराव देशमुख हे त्यासाठी जागा खाली करू देणार, असेही काहींनी सांगितले. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.

पडळकर हे वेगळा पक्ष कडून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जातील, अशी चर्चा सुरू झाली. पडळकर शिवसेनेत जाऊन विधानपरिषद निवडणूक लढतील अशीही चर्चा सुरू झाली. कधी राष्ट्रवादीशी ते संधान साधू असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ते 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर ते निवडणूक लढले होते. आता ते पुन्हा भाजपमध्ये जात आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopichand Padalkar may be enterd in BJP