महिला अत्याचारप्रश्‍नी सरकार गंभीर नाही; भाजप महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षा उमा खापरे

uma khapare
uma khapare



सांगली ः राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र महाआघाडी सरकार गंभीर नाही. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. महिलांना सुरक्षितता जाणवेपर्यंत भाजप महिला मोर्चातर्फे सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत, असा इशारा भाजप महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. महिला सक्षमीकरणासाठी भाजपचे कसोसीने प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवड कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, नेत्या निता केळकर, प्रदेश उपाध्यक्ष ज्योती जाधव, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


प्रदेशाध्यक्षा खापरे म्हणाल्या,""राज्यात महिलांवर अत्याचाराची मालिका सुरू आहे. अल्पवयीन मुली, बालिकांवरही निर्घृण अत्याचार होत आहेत. मात्र एवढे अत्याचार होऊनही राज्य सरकार या अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. या सरकारला जागे करण्यासाठी भाजपकडून हे राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली. मात्र तरीही गांभिर्याने घेण्यात आलेले नाही. राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. दिशा कायद्याची कडक अमंलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यास अपयशी ठरलेल्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी महिला मोर्चातर्फे आवाज उठवला जाईल. महिला तसेच बाल आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक तत्काळ व्हावी, यासाठी वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, सरकारने असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे.'' 

यावेळी नगरसेविका भारती दिगडे, प्रभाग समिती सभापती सविता मदने, सोनाली सगरे, अप्सरा वायदंडे, गीतांजले ढोपे-पाटील, उर्मिल बेलवकर, नसिमा नाईक, डॉ. अपेक्षा महाबळेश्‍वकर, ऍड. शैलजा पंडित, ऍड. वैशाली शेळके, शैलजा कोळी, मनिषा शिंदे, उषा पवार, वैशाली पाटील, लक्ष्मी सरगर, वंदना जाधव, अमृता शिंदे, प्राची मेस्त्री, गौरी माहीकर, स्मीता भाटकर उपस्थित होत्या.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com