नुकसान भरपाईसाठी कागदपत्रे जमवण्याची वाट सरकारने पाहू नये

अजित झळके 
Thursday, 22 October 2020

राज्यात झालेल्या प्रचंड पावसाने आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने सुरु करावी. त्यासाठी कागदपत्रे जमवण्याची वाट सरकारने पाहू नये. खावटी अनुदान वाटप करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

सांगली : राज्यात झालेल्या प्रचंड पावसाने आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने सुरु करावी. त्यासाठी कागदपत्रे जमवण्याची वाट सरकारने पाहू नये. खावटी अनुदान वाटप करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी खचून गेले आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले. त्यांना कागद न मागता खावटी अनुदान तातडीने द्यावे. एकरी मदत व घराच्या नुकसानीसाठी 40 हजारांची तातडीची मदत करा. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी बोजा पडतो, हे लक्षात घेऊन अशा संकटांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखाव्यात. समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा. ओढ्या काठावरील अतिक्रमणे तातडीने काढावीत. 

ओढ्यांना मोकळे करावे. त्यांची खोली व रुंदी वाढवण्याचे काम आणीबाणीच्या पातळीवर करावे. समुद्र सपाटीजवळच्या खारेपाट क्षेत्रात समुद्राचे पाणी आज येऊन निचरा होण्यासाठी बंधारे व उघड्या गटारी मोडल्याने अतिवृष्टीने पाणी नुकसान करते आहे. त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर डॉ. पाटणकर यांच्यासह जयंत निकम, संतोष गोटल, चैतन्य दळवी यांच्या सह्या आहेत.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government should not wait for the documents