गडकिल्ल्यांबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

- गडकिल्ल्यांचे संवर्धन हे झाले पाहिजे

- राज्य सरकारने लोकांच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजेत

कोल्हापूर : गडकिल्ल्यांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर साताऱ्याचे आमदार आणि छत्रपती घराण्यातील सदस्य श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गडकिल्ल्यांचे संवर्धन हे झाले पाहिजे. मात्र, हे करत असताना राज्य सरकारने लोकांच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपतींचा इतिहास हा या गडकिल्ल्यांच्या अवती-भवती फिरत असतो. प्रत्येक किल्ल्याला एक वेगळा इतिहास आहे. संवर्धनासाठी निधी द्या, सगळं करा. मात्र, याबाबत सरकारने मराठी माणसाच्या भावनेची कदर करावी, अशी सूचना त्यांनी केली. 

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यावर योग्य निर्णय घेतीलच. परंतु साताऱ्याच्या घराण्यातील प्रतिनिधी म्हणून मी त्यांनासुद्धा या गोष्टींबाबत सूचना करणार आहे, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government should respect the sentiments of Peoples about the Fort says Shivendra Singh Raje Bhosale