esakal | शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधेच मिळणार : यड्रावकर
sakal

बोलून बातमी शोधा

 Govt will get generic medicines in government hospital : Yadravakar

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यापुढे जेनेरिक औषधेच रुग्णांना दिली जातील. त्यासाठीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी आज (शनिवारी) दिली.

शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधेच मिळणार : यड्रावकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यापुढे जेनेरिक औषधेच रुग्णांना दिली जातील. त्यासाठीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी आज (शनिवारी) दिली. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा श्री. यड्रावकर यांनी आज घेतला.

आढावा बैठकीनंतर बोलताना यड्रावकर म्हणाले, "राज्यातील सर्वच वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणींचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. बहुसंख्य ठिकाणी निधीची प्रमुख अडचण आहे. परंतु निधीसाठीचीही कोंडी येत्या नजीकच्या काळात सोडवली जाईल. राज्याच्या अंदाजपत्रकातच यासाठी आर्थिक तरतुदी करून केंद्राकडून आलेला निधी वापरण्यासाठी आणि रुग्णांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल.

शासकीय रुग्णसेवेवरील सामान्य रुग्णांचा विश्वास वाढतो आहे. त्यामुळे याच रुग्णालयांमध्ये सुपरस्पेशलिटीची आरोग्यसुविधा देण्यासाठीही शासनाचा प्रयत्न असेल. मिरज शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळ वाढवण्यासाठीही आपण विशेष लक्ष देणार आहोत. येथील बाह्यरुग्ण विभागात वर्षाला सहा लाखाहून येणारे रुग्ण हे शासकीय आरोग्य व्यवस्थेमधील चांगल्या सेवेचे लक्षण आहे. ही सेवा अधिकाधिक लोकोपयोगी आणि आधुनिक उपचारांच्या पद्धतीने लोकाभिमुख करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्‍टरांच्या समस्यांबाबतही राज्य सरकार सकारात्मक भूमिकेत आहे. त्यांचेही प्रश्न येत्या काही महिन्यात सोडवण्याचा आपला प्रयत्न असेल.' 

यावेळी शासकीय रुग्णालयातील मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न शासकीय रुग्णालयातील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी घेतला. यावेळी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बदली कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन मोहन गवळी यांनी दिले. याशिवाय शासकीय रुग्णालय वैद्यकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने संजय व्हनमाने यांनीही ही आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना दिले.

loading image