आजी गेल्याच्या दु:खापेक्षा तिच्या सोन्याची चिंता 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

शहरानजीक असणाऱ्या या गावात सत्तरी गाठलेली आजी एकटीच राहत होता. तिला चार मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे, असे गावातील लोकांनी सांगितले.

सांगली ः गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच एका गावात काळीमा फासण्यात आला. पाच दिवस अत्यंस्काराविना पडून राहिला मृतदेहाचे अखेर इन्साफ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अत्यसंस्कार केले. मात्र, ती आजी गेल्याचे दुःख ही त्याच्या रक्तातील नातलगांना नसून आजीजवळ असणाऱ्या सोन्याची चौकशी केली. मन पिळवटून टाकणारा हा धक्कादायक प्रकार सांगली शहरानजीक एका गावात घडला. 

शहरानजीक असणाऱ्या या गावात सत्तरी गाठलेली आजी एकटीच राहत होता. तिला चार मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे, असे गावातील लोकांनी सांगितले. मात्र, काही कारणास्तव त्या आजीला या वयात एकटच राहणे भाग होते. स्वतःच दोनवेळच्या भाकरीची व्यवस्था करत ती आयुष्य जगत होती. पैशांची कमतरतेमुळे व्याधींकडे लक्षच दिले नाही. अखेर पाच दिवसापूर्वी त्या आजीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनाही माहिती नसावे इतकी दुर्दैवी बाब त्या आजीच्या नशीबी आली. 

पाच दिवसानंतर आजी दिसून न आल्याने शेजापारी राहणाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनाही याबाबत माहिती मिळाली. हा सारा प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने इन्साफचे प्रमुख मुस्तफा मुजवार यांना कळविले. मुस्तफा टीम घेवून तातडीने रवाना झाला. कुजलेल्या अवस्थेत असलेला तो मृतदेह अत्यसंस्कारासाठी घेवून जातांना कुटुंबातील एकास आजीची आठवण आली. तो धावात आला काही विचारण्यापूर्वीच त्याने आजी जवळील सोने विचारणा केली. साऱ्यांनाच धक्का बसला. अखेर त्याला तेथून हुस्कावून लावण्यात आले.

स्थानिक ग्रामस्थ आणि इन्साफचे ऋत्विक डुबल, सचिन कदम, दादासो मोहिते यांनी अत्यसंस्कारासाठी घेवून गेले. शास्त्रशुद्धपणे त्यांचे अत्यसंस्कार केले. मात्र, आजच्या युगात नात्यांना काळीमा फासणारी ही घटना शहरानजीक घडल्याने वाऱ्यासारखी पसरली. समाजमाध्यमांसह विविधस्तरावरून रोष व्यक्त केला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandma worried about her gold more than the grief of the past