येळावीत शेतमजुराचे द्राक्षघड तोडले: तणनाशकही फवारले

grapes destroyed by unknown people in yelavi of sangali district
grapes destroyed by unknown people in yelavi of sangali district

सांगली : येळावी (ता. तासगाव) येथील शेतमजूर शहाजी कोळी यांच्या एक एकरातील द्राक्ष बागेतील घड मंगळवारी रात्री अज्ञाताने कापले. उरले सुरले पीकही शेतकऱ्यांच्या पदरात पडू नये म्हणून वेलीवर तणनाशक फवारले. त्यामुळे चार-पाच लाखांचे नुकसान झाल्याने कुटुंब हादरले आहे. गेल्या वर्षी गारपीट, यंदा चांगले पीक येऊनही अज्ञाताने घड तोडणे, तणनाशक फवारल्याने सलग तीन वर्षे झालेल्या चार लाख रुपये खर्च कसा सोसायचा आणि पुढील वर्षी पीक येईपर्यंत बाग टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

श्री. कोळी असे शेतमजुराचे नाव आहे. अनेक वर्षे ते शेतमजूर म्हणून दुसऱ्यांच्या शेतांत राबत होते. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली. मुलांच्या शिक्षणाचा खर्च करता यावा म्हणून भागावा यासाठी चार वर्षांपूर्वी द्राक्ष बाग घालण्याचा निर्णय घेतला. सकाळी मजुरी, दुपारनंतर स्वतःच्या बागेतील कामासाठी त्यांची हंगामात धावपळ ठरलेली असे. हे नित्याचे झाले होते. गेली दोन वर्षे विविध संकटांना सामना करावा लागतोय. पहिल्या पिकांसाठी एकरी चार लाख, दरवर्षी पीक येईपर्यंत एकरी दोन लाखांचा खर्च ठरलेला. गेल्या वर्षी गारपिटीने बाग गेली. नैसर्गिक संकट समजून नाउमेद न होता पुन्हा हंगामासाठीची लढाई सुरू ठेवली. 

यंदा बाग चांगली आली होती. मात्र मंगळवारी रात्री बांबवडे रस्त्यावरील बागेतील 85 ते 90 टक्के घड अज्ञाताने तोडले. एवढे करूनही ते थांबले नाहीत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्यांनी उरले-सुरले घडही हाती लागू नयेत म्हणून वेलीवर तणनाशक फवारले. त्यामुळे कोळी यांच्या आशा संपुष्टात आल्या. चार-पाच लाखांचे उत्पादन बुडणार आहे. तीन वर्षांत एकही रुपयाचे उत्पन्न न मिळाल्याने पाच लाख खर्च गृहीत धरल्यास कुटुंबाला 10 लाखांचा फटका बसला. रात्रीत होत्याचे नव्हते झाले. 

माणुसकीचा अंत... 

द्राक्ष बागांवर तणनाशक फवारणीचे प्रकार घडताहेत. पक्व घड कापून नेण्याच्या घटनाही झाल्या आहेत. येळावीतील घटना माणुसकीचा अंत म्हणावा लागेल. संबंधित शेतकरी विवंचनेत आहे. कोरड्या दिलाशाने काही होणार नाही. त्यांना मदत केली पाहिजे. विविध मागण्यांसाठी आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घ्यायला हवा. 

जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात द्यावा.

घटना दुर्दैवी म्हटला पाहिजे. नुकसान झालेल्या बागेची समक्ष पाहणी केली. निंदनीय कृत्य आहे. शेतकरी हताश झाल्याचे स्पष्टपणे जाणवले. सरकार, जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात द्यावा. परिसरातील शेतकऱ्यांनीही मदतीसाठी पुढे यावे.

- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com