

Traders inspect fresh green raisins
sakal
सांगली : सांगली बाजार समितीत चालू हंगामातील बेदाणा सौद्यास आज सुरुवात झाली. बेदाणा सौदा हॉलमध्ये प्रारंभप्रसंगी उत्कृष्ट प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो ४०१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पहिल्याच दिवशी २१ दुकानांमध्ये तब्बल दहा गाड्या म्हणजे सुमारे १०० टन नवीन बेदाण्याची आवक झाली.