esakal | चाळीस वर्षांनंतही शेतकरी भेदरलेलाच! प्रा. सुभाष जोशी 
sakal

बोलून बातमी शोधा

Greetings  martyred farmers of the tobacco movement nipani marathi news

आंदोलनानंतर चाळीस वर्षानंतरही शेतकरी भेदरलेलाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन अन्यायाबाबत लढा द्यावा, असे आवाहन माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी केले.

चाळीस वर्षांनंतही शेतकरी भेदरलेलाच! प्रा. सुभाष जोशी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसह वखारीत काम करणाऱ्या महिलांना कष्टाच्या तुलनेत दाम मिळाला पाहिजे, यासाठी निपाणीत चाळीस वर्षांपूर्वी ऐतिहासिक आंदोलन झाले. त्याची देशपातळीपर्यंत दखल घेण्यात आली. पण अजूनही शेतकऱ्यांना उत्पादित शेतीमाल विकण्यासाठी झगडावे लागत आहे ही शोकांतिका आहे. अलीकडच्या काळात तंबाखूला चांगला दर मिळत असताना काही मंडळींकडून जीएसटीचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसविले जात आहे. पण त्या विरोधातही आपण आवाज उठवला आहे. 

तिसऱ्या आघाडीने स्मारकासाठी जागा मिळविल्यास भविष्यात स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. एकंदरीत आंदोलनानंतर चाळीस वर्षानंतरही शेतकरी भेदरलेलाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन अन्यायाबाबत लढा द्यावा, असे आवाहन माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी केले. येथील ऐतिहासिक तंबाखू आंदोलन स्थळावर मंगळवारी (ता. ६) सकाळी आयोजित हुतात्मा शेतकऱयांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.


रयत संघटनेचे चिक्कोडी तालुका अध्यक्ष राजू पोवार यांनी, हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लावून त्यांच्या नावे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करावेत. 
तिसर्‍या आघाडीचे आंदोलन काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात नसून शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात असल्याचे सांगितले.
प्रा. एन. आय. खोत यांनी, आजतागायत शेतकरी आंदोलनाचा राजकीय नेतेमंडळींनी फायदा उठवला आहे. शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ न देण्यासाठी स्मारकाच्या ठिकाणी समुदाय भवनाच्या उभारणीची मागणी केली. विठ्ठल वाघमोडे यांनी, हुतात्म्यांच्या वारसांची दयनीय अवस्था झाली असून त्याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी आय. एन. बेग, कॉम्रेड सी. ए. खराडे, जयराम मिरजकर, प्रसन्नकुमार गुजर, सुधाकर माने यांच्यासह शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी एस. के. पाटील, अशोक पाटील व मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले.


यावेळी उद्योजक पुष्कर तारळे, बचाराम सांडूगडे, कॉम्रेड अनिल ढेकळे, बाबासाहेब मगदूम, माजी नगरसेवक सुधाकर कुराडे, सुनील गाडीवड्डर, भगवंत गायकवाड, रवींद्र मुतालिक, निरंजन कमते, निकु पाटील, रमेश भोईटे, गुलाब नाईकवाडे, परविन नाईकवाडे, साहिरा शेख, आप्पासाहेब जगदाळे, बाबासाहेब देसाई, अण्णासाहेब गुरव, प्रशांत कुराडे, पोपट नागराळे, उमेश भारमल, महादेव शेळके, वसंत पोवार, चंद्रकांत पवार, कुमार आंबोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


सकाळ'मधील पुरवणीचे कौतूक!

तंबाखू दराच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला चाळीस वर्षे होत असल्याने 'सकाळ'मधून आंदोलनाबाबत विविधांगी सविस्तर लेख छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाल्याचे सांगून माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, विठ्ठल वाघमोडे, आय. एन. बेग व मान्यवरांनी 'सकाळ'चे कौतूक केले.

वर्षभरात भवनाच्या पूर्ततेसाठी शपथ

तंबाखू आंदोलनाला ४० वर्षे पूर्ण होत असलीतरी अद्यापही स्मारक परिसरात सुशोभिकरण अथवा भवन झालेले नाही. त्यामुळे भवनाच्या बांधकामासाठी यापूर्वी अनेकांनी देणगी जाहीर केली आहे. शिवाय आताही काहींनी भरीव देणगी दिली आहे. त्यामुळे वर्षभरात भवनाचे काम करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
 

loading image