
तासगाव (सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 पासून सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे अनेक कुटुंबे अक्षरशः उपाशी आहेत यापैकी सर्व नाहीत परंतु दोन ते अडीच हजार कुटुंबांना किमान पंधरा वीस दिवसांचे उपजीविकेचे साहित्य तासगाव तालुक्यातील युवक कार्यकरते करताना दिसत आहेत. गेल्या दहा दिवसापासून हे किट वाटपाचे काम सर्व स्तरावर होताना दिसत आहे.
तासगाव तालुका 22 मार्च पासून बंद आहे. शेतीच्या कामाशिवाय काहीही कामे सुरू नाहीत दुकाने बंद आहेत. परिणामी दररोज कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुरी पूर्णपणे बंद आहे. स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळते पण त्याला काही बंधने आहेत सरसकट सगळ्यांना गहू तांदूळ मिळत नाही. अशावेळी माणुसकीच्या हाकेला तालुक्यातील युवक स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावत आहेत. किमान काही दिवस तरी त्यांच्या पोटाला मिळावे यासाठी धडपड सुरू आहे.
सरकारी पातळीवर फतवा निघाला आहे. मात्र त्या आधी युवक सरसावले आहेत. लॉकडाऊन च्या सुरुवातीच्या दोन चार दिवसात मास्क आणि सॅनिटायझर वाटपात सगळे पुढे होते मात्र समाजाची खरी गरज तेल मिठाची होती. यापार्श्वभूमीवर सद्या सुरू असलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे.
सद्या जनसेवा संस्थेच्या माध्यमातून नगरसेवक अभिजित माळी, माजी नगरसेवक अविनाश पाटील, सावर्डे चे सरपंच प्रदीप माने, यांनी काही दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत घेऊनतासगाव सह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अक्षरशः हजारो जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले आहे गेली आठ दहा दिवस अखंड काम सुरू आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने इद्रिस मुल्ला यांनी आणि त्यांच्या मुस्लिम सहकार्यानी आतापर्यंत 700 कुटुंबापर्यत किट पोहोचविले आहेत.
शिवाय किरण माने आणि त्याच्या सहाकर्यानी स्वराज्य फाउंडेशन च्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन 100 ते 150 किटस तयार करून गरजूपर्यंत पोहोचविण्याची तयारी केली आहे. हे सारे सुरू आहे ते कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ! लोकांकडूनच घेऊन गरजूंना मदत देण्याचे काम ही मंडळी मनःपूर्वक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अनेकजण मदत करण्यासाठी पुढेही येताना दिसत आहेत हे ही तितकेच कौतुकास्पद नाही का ?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.