अंधश्रद्धेचा विळखा घट्टच; भानामतीच्या "मडक्‍या'ची जोरदार चर्चा 

The grip of superstition is tight; Strong discussion of Bhanamati's "pottery"
The grip of superstition is tight; Strong discussion of Bhanamati's "pottery"
Updated on

वाळवा : अंधश्रध्दांचा विळखा अजूनही किती घट्ट आहे याचे दाखले ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त पुढे येत आहेत. अत्यंत अटीतटीच्या अशा नागठाणे (ता. पलूस) ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. गणेशनगर परिसरात पडलेल्या एका मडक्‍याने भलतीच खळबळ उडवून दिली. स्वच्छ लाल कपड्यात एखादा अस्थीकलश वाटावा, असे मडक्‍याला सजवले आहे. 

काही महिन्यांपूर्वी नागठाणे येथील एका धार्मिक स्थळ परिसरात 40 देशी कोंबड्या, तितकेच लिंबू, खिळे, सुया, विशिष्ट रंगाचे कापड, भात असा उतारा टाकला होता. त्यानंतर मडके चर्चेत आले. दर निवडणूकीला असे होत असतेच. निवडणूक अटीतटीची असते. अशा प्रकारात राजकीय कार्यकर्तेच आघाडीवर असतात. सध्या लाल कपड्यातील मडक्‍याला दुरूनच पाहत ग्रामस्थ पुढे जात आहेत. जगभरात परग्रहावर जायच्या चर्चा होत असल्या तरी खेड्यांत अजूनही असे प्रकार सुरु आहेत. त्याची दबक्‍या आवाजात चर्चा होते. निवडणुकांमुळे ती जाहीरपणे होत आहे इतकेच. 

निवडणूक काळात होणाऱ्या अशा कृत्यांबाबत कारवाई तरी कोणावर करायची ? मात्र निदान गावातील नेते मंडळींनी तरी अशा प्रकारांचा जाहीर निषेध करायला हवा. अन्यथा त्यांचा या प्रकाराला पाठिंबाच आहे असे समजावे लागेल. सजग ग्रामस्थांनी पॅनेल प्रमुखांकडे निषेधासाठी आग्रह धरून विवेकवादी विचारांची वाट नव्या पिढीला दाखवून द्यावी. 
- राहुल थोरात, अंधश्रध्दा निर्मुलन समिती 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Greenfield Highway latest update
Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Marathi News Esakal
www.esakal.com