लॉकडाउनमध्ये किराणा दुकाने, वाहने, खाजगी आस्थापना, बस बंद राहणार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

बुधवारी रात्री पासून 30 जुलैपर्यंत लॉकडाउन असणार आहे. 

सांगलीसह शहरी भागात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बस खाजगी वाहने यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. बुधवारी रात्री पासून 30 जुलैपर्यंत लॉकडाउन असणार आहे. 

 

खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील - 
 

 • सांगली जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सांगली जिल्ह्यातील नागरी भागात येणारे, तसेच नागरी भागातून बाहेर जाणारे सर्व प्रवासी व वाहने प्रतिबंधित असतील. 
 • लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इ. कार्यक्रम 
 • सर्व सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने 
 • सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक वि. कृषी सेवा केन्द्र, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुनाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. 
 • उपहारगृह, बार, लोज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट 
 • वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने व तत्सम आस्थापना 
 • सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉकर्सना बंदी 
 • सर्व केशकर्तनालय, सलुन/स्पा/ब्युटी पार्लर तत्सम आस्थापना 
 • सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, बेकरी, किरकोळ व ठोक विक्री 
 • चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री 
 • सर्व प्रकारची खाजगी बांधकाम/कंस्ट्रक्‍शनची कामे (अत्यावश्‍यक सेवेची बांधकामे उदा.रुग्णालये व ज्या 
 • बांधकाम ठिकाणी कामगारांची निवासी राहण्याची व्यवस्था आहे. अशी बांधकामे वगळून) 
 • सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे/मोकळया जागा, उदयाने, बगीचे 
 • शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी 
 • सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा 
 • सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षागृह, सभागृह 
 • खाजगी व सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरु अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देणे 
 • खाली नमूद सूट देणेत आलेल्या बाबीव्यातिरिक्त इतर सर्व अस्थापना 

 

यांना सुट देणेत येत आहे. 

 • अत्यावश्‍यक सेवा व आस्थापना, 
 • सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणान्या आस्थापना, रक्तपेढी 
 • बॅंक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे व बैंकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा 
 • न्यायालये व सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालये सुरु राहतील. 
 • दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंटमिडिया यांची कार्यालये. वर्तमानपत्रे वितरण अनुज्ञेय राहील. 
 • सर्व वैद्यकीय, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ऍम्ब्युलन्स तसेच अत्यवश्‍यक सेवेतील कर्मचारी यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेणेची आवश्‍यकता नाही. 
 • पेट्रोल/डिझेल पंप फक्त अत्यावश्‍यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैदयकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसारमाध्यमे, वृतपत्रे, मिडियाचे कर्मचारी यांची वाहने इ. साठीच सुरु राहतील. 
 • वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील. 
 • शिवभोजन थाळी योजना सुरु रहील. 
 • जीवनावश्‍यक सेवा व आस्थापना. 
 • दुध संकलन व त्यासंबंधित वाहतूक 
 • किरकोळ दुध विक्री व घरपोच दुधाचे वितरण 
 • एलपीजी गॅस घरपोच वितरण करणान्या आस्थापना व वाहने 
 • सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना व वाहने 
 • दुरध्वनी, इंटरनेट व बॅक एटीएम संबंधीत आस्थापना 
 • वंदे भारत योजनेंतर्गत तसेच कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्‍टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण साठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सांगली जिल्ह्यात सुरु असलेले राष्ट्रीय प्रकल्प व शासकीय कामे 
 • जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्या दरम्यान करावयाची अत्यावश्‍यक कामे 
 •  
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grocery stores, vehicles, private establishments, buses will remain closed during the lockdown