
जत तालुका कायम दुष्काळी आहे. दुष्काळा पाचवीला पूजलेला. पाच वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी 700 ते 800 फूटापर्यंत खाली गेली. रब्बी व खरीप हंगाम वाया गेला. द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकण्यात आल्या.
संख : जत तालुका कायम दुष्काळी आहे. दुष्काळा पाचवीला पूजलेला. पाच वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी 700 ते 800 फूटापर्यंत खाली गेली. रब्बी व खरीप हंगाम वाया गेला. द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकण्यात आल्या.
पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली. जनावरांची संख्या कमी झाली. सन 2020 मध्ये जत तालुक्यात पाऊस दमदार झाला. भूजल पातळी 3.07 मीटरने वाढली आहे. सध्याची पाणी पातळी पाच वर्षातील उच्चांकी आहे. तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. रब्बीतील पिके, द्राक्षे, डाळिंब व उन्हाळी पिकांना लाभ होणार आहे. पाणी टंचाई जाणवणार नाही. उन्हाळ्यात द्राक्ष बागांची खरड छाटणी वेळेवर होईळ. डाळिंब बागांचा बहर धरला जाणार आहे. शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पाऊस कमी असल्याने जिराईत व कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. सन 2009 नंतर ऑक्टोबर 2020 मध्ये महिन्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यावर्षी 778 मि. मी. इतका पाऊस झाला. मुचंडी, शेगाव, संख, जत, कुंभारी, तिकोंडी या मंडल विभागात अतिवृष्टी तर उमदी, माडग्याळ मंडळात कमी पाऊस झाला.संख मध्यम प्रकल्प व 25 तलाव, 12 कोल्हापूर बंधारे व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने तुडूंब भरले आहेत.
बोर नदीवरील सर्व बंधारे भरले आहेत. गेल्या पाच वर्षातील पाणी पातळी वाढली आहे. उटगी दोड्डनाला मध्यम प्रकल्प, अंकलगी, दरीबडची साठवण तलाव 50 टक्केच भरलेत. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पूर्व भागातील अपवाद वगळता सोन्याळ, उटगी, जाडरबोबल, निगडी बुद्रुक परिसरात पाऊस कमी झाला. पाण्याची पातळी कमी आहे. जलसंधारणाची कामे ब-यापैकी झालीत. पाणी जमिनीत मुरल्याने भूमिगत पाण्याची पातळी वाढली. पुरेशी ओल झाल्याने 62 हजार 622 हेक्टर क्षेत्रावर रब्बीतील पिकांची पेरणी झाली. डाळिंब हंगाम एप्रिल, मे महिन्यात धरला जाणार आहे.
तीन वर्षातील पाणी पातळी :
2018 2019 2020
7.14मीटर 6.44 मीटर 3.07 मीटर
मागील पाच वर्षातील सरासरी पाणी पातळी, मागील पाच वर्षातील वाढ, सरासरी पाणी पातळी 3.07 मीटर 5.90 मीटर 2.83 मीटर
संपादन : प्रफुल्ल सुतार