
किल्लेमच्छिंद्रगड : वाळवा तालुक्याच्या पूर्वोतर गावातील शेतशिवारात विहीरीत पाणी आहे. मात्र माणसाबरोबर पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची सोय गावातून नळपाणी पुरवठा योजनेद्वारे केली जातेय. ही परिस्थिती निर्माण होण्यास साखर कारखान्यांच्या कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पामुळे तसेच शिवारात शेणखतास पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या बगॅस तसेच मळीमिश्रीत पाण्याचा वापर कारणीभूत आहे. मळी मिश्रीत पाण्याचा पाझर जमिनीत होत असल्याने भूगर्भातील पाणी खराब झाले आहे.