‘‘चंद्रकांतदादा राज्यातील ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते आहेत. कदाचित त्यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल, मात्र मी अपक्ष खासदार आहे. मला कोणत्याही पक्षात प्रवेश करता येत नाही."
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल मिरजेत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना भाजपसोबत येण्याची थेट ऑफर दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशाल शेजारी बसलेले असताना त्यांनी ऑफर अद्यापही खुली असल्याचे सांगत पुन्हा ‘गुगली’ टाकली.