दहावी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Sakal-Vidya
Sakal-Vidya

‘न्यू एज्युकेशन प्लॅन २०२०’ विषयी मिळणार माहिती
नगर - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या बदलांना सामोरे जाताना अभ्यासाचे नियोजन कसे करावे, परीक्षेचे नेमके स्वरूप यांविषयी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन हवे असते. याच उद्देशाने ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’तर्फे नगर येथे रविवारी (ता. आठ) चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 

शालेय अभ्यासक्रमात, प्रश्‍नपत्रिका व विषयांनुरूप झालेले बदल समजून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धत विद्यार्थिकेंद्रित असल्याने, विषयानुरूप योग्य नियोजन व आकलन महत्त्वाचे असणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप कसे असणार आहे, त्या अनुषंगाने अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे असावे, परीक्षेला तीनच महिने राहिले असल्याने अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता परीक्षेला कसे सामोरे जावे, यांविषयी समुपदेशन या चर्चासत्रातून केले जाणार आहे.

त्याचबरोबर भावी काळातील दहावीचे स्वरूप म्हणजेच ‘न्यू एज्युकेशन प्लॅन २०२०’विषयी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित वक्‍ते प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करतील. दहावी हा भावी करिअरचा पाया असल्याने, बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीमुळे पालक आपल्या पाल्यासाठी कोणते करिअर योग्य आहे, याबाबत साशंक असतात. दहावीनंतर मेडिकल व इंजिनिअरिंगव्यतिरिक्त उपलब्ध असणारे करिअरचे पर्याय, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी, दहावीनंतर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था व त्यांची तयारी कशी करावी, यांविषयी सखोल मार्गदर्शन या चर्चासत्रातून मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com