तासगाव : तासगाव हून साताऱ्याकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने अपघात केल्यानंतर त्या गाडीत चक्क १ लाख ७४ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांना सापडला. पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करून गाडीच्या चालकावर अन्नसुरक्षा आणि मानक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.