सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचा पुढाऱ्यांच्या दारात "हलगी बजाव'

बलराज पवार
Monday, 21 September 2020

मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या शुक्रवारी (ता. 25) जिल्ह्यात एकाचवेळी ठिय्या आंदोलन तसेच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मंगळवारपासून हलगी बजाव आंदोलनही करण्याचा निर्णय आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

सांगली : मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या शुक्रवारी (ता. 25) जिल्ह्यात एकाचवेळी ठिय्या आंदोलन तसेच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मंगळवारपासून हलगी बजाव आंदोलनही करण्याचा निर्णय आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई आणि डॉ. संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. चर्चेअंती जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 25) सर्व तालुक्‍यात तसेच गावपातळीवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. मोर्चाच्या आचारसंहितेनुसार शांततेत आंदोलन होईल. चिथावणीखोर भाषणे टाळून सुरक्षित अंतर पाळून आंदोलन करण्यात येईल. त्यायाबरोबरच मंगळवारपासून (ता.22) जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात येईल. त्याच दिवसापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उप समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना जिल्ह्यातून एक लाख मोबाईल मेसेज पाठवण्यात येतील. 

बैठकीत राहुल पाटील, प्रवीण पाटील, विजय धुमाळ, अर्जुन कदम, धनंजय भिसे, विजय शिंदे, राहुल जाधव, नाना पाटील, बापू गिड्‌डे, धनंजय शिंदे, दिनकर मोहिते, दिग्विजय मोहिते, प्रदीप कदम, संजय गायकवाड, अमृतराव सुर्यवंशी, अनिल पाटील, तुकाराम सातपुते, सुरज चव्हाण, आप्पासाहेब यादव आदी सहभागी झाले होते.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Halgi Bajav' at the door of leaders by Maratha Morcha