
अजाणपेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा : प्रमोद मुतालिक
बेळगाव : मुस्लिमाकडून अजाणसाठी वापरल्या जाणाऱ्या माईक विरोधात (भोंगा) येत्या ९ मे पासून पहाटे ५ पासून राज्यातील मंदिरामध्ये त्यापेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा म्हणण्यात येईल. अशी माहिती श्री राम सेनेचे राष्ट्रीय प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवार (ता.५) कन्नड साहित्य भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. श्री. मुतालिक म्हणाले, मुस्लिमांच्या अजाण माईक विरुद्ध राज्यातील २ हजार हिंदू मंदिरात भजन व हनुमान चालीसा मुस्लिमांच्या अजाणपेक्षा दुप्पट आवाजात म्हणण्यात येणार आहे.
आपला मुस्लिमांच्या आजाणला विरोध नसून त्यामुळे होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाला विरोध आहे. आपली सरकारला विनंती आहे, उत्तरप्रदेशमध्ये ६० हजार माईक जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे कर्नाटकात देखील कारवाई झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मइ यांनी धाडस दाखवावे. एखाद्यावेळी आपल्यावर कारवाई करण्यात येईल पण, सरकारमध्ये मुस्लिमांच्या विरोधात कारवाई करण्याची ताकद नाही. भाजप सरकारने मुस्लिमांच्या माईक विरोधात कारवाई केली नाही तर तुमचे १५० चे मिशन साकार होणार नाही. मुस्लिमांचे एकही मत भाजपला पडत नाही.
तरी देखील त्यांची पर्वा का. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात मुस्लिमांच्या अजाणविरोधात सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. तरीदेखील अध्यापही अजाण थांबलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले क्रम उद्धटपणाचे आहेत. आजणमुळे त्रास होणाऱ्या माईक विरुद्ध आंदोलन करणाऱ्या हिंदूंवर कारवाई केली जात आहे. तुमचे वडील हिंदुत्ववासाठी लढलेले सेनानी होते. शिवसेनेला जनता धडा शिकवेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
Web Title: Hanuman Chalisa Muslim Mosque Voice Loudespeakers Temple Pramod Mutalik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..