
द्राक्षाचा हंगाम नुकतेच सुरू झाला असताना फळांचा राजा असलेला आंबा बाजारात यंदा लवकरच दाखल झाला आहे. देवगड येथील हापूस आंबा आणि पायरी आंबा विक्रीसाठी बालाजी चौकातील जुन्या भाजी मंडईजवळील फळ दुकानात आला आहे. 12 व 15 नगाच्या बॉक्सचा दर 3500 ते 4 हजार रूपये आहे.
सांगली: द्राक्षाचा हंगाम नुकतेच सुरू झाला असताना फळांचा राजा असलेला आंबा बाजारात यंदा लवकरच दाखल झाला आहे. देवगड येथील हापूस आंबा आणि पायरी आंबा विक्रीसाठी बालाजी चौकातील जुन्या भाजी मंडईजवळील फळ दुकानात आला आहे. 12 व 15 नगाच्या बॉक्सचा दर 3500 ते 4 हजार रूपये आहे.
फळांचा राजा आंबा साधारणपणे मार्च महिन्यात येण्यास सुरवात होते. तत्पूर्वी अन्य भागातील आंबा येतो. परंतू ग्राहकांना खरी प्रतिक्षा असते ती देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंब्याची.
यंदा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात देवगड येथून बालाजी चौकातील शाहरूख मुन्शी यांच्या लेटस् फळ दुकानात हापूसचे 23 बॉक्स दाखल झाले आहे. हापूसची बाजारातील पहिलीच एंट्री आहे. दर ही जास्त आहे. 12 व 15 नगाच्या हापूस बॉक्सचा दर साडेतीन हजार ते 4 हजार रूपये आहे.
आंबा दाखल झाल्याचे पाहून तो पाहण्यास आणि दर विचारण्यास गर्दी होत आहे. मुहूर्ताचा आंबा खरेदी करणारे हौशी ग्राहकही आहेत. हापूसबरोबर यंदा पायरीही लवकरच दाखल झाला आहे. पायरी आंब्याच्या डझनाच्या बॉक्सचा दर 2500 रूपये इतका आहे. यंदा आंब्याची आवक भरपूर आहे. हंगामाच्या शेवटी ती जास्त असेल, असे मुन्शी यांनी सांगितले.
संपादन : प्रफुल्ल सुतार