हरणटोळ हा मध्यम विषारी साप आहे. त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्यापासून लहान मुलगा आजारी पडू शकतो.
चांदोली जंगल (Chandoli Forest) फिरायला निघालाय, नक्की जा. आपल्या जिल्ह्याचं ते वैभव आहे. फिरता-फिरता सहज एखाद्या झाडाच्या फांदीला, वेलीला, रोपट्याला हात लावून उभे राहू नका. कारण, त्या हिरव्यागार रंगात रंगून गेलेला गवत्या अर्थात हरणटोळ हा साप तुमच्या हातावर येऊ शकतो. हा गवत्या चांदोलीच्या अंगाखांद्यावर खेळतो.