Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Raju Shetti candidate of Hatkanangale: सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी राजू शेट्टी यांना बोलतं केलं.
Raju Shetti
Raju Shetti

Lok Sabha- हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे. सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी राजू शेट्टी यांना बोलतं केलं. त्यांना चित्रपटात काम करावसं का वाटलं याबाबत शेट्टी यांनी भाष्य केलंय.

चित्रपटाची कथा चांगली होती. एक साखर कारखान्याचा चेअरमन होता आणि मी शेतकरी होतो. आमच्या दोघांमध्ये संघर्ष होतो असा तो चित्रपट होता. दोन कुटुंबातला हा संघर्ष होता. माझ्या आवडीचा तो विषय होता त्यामुळे मी भूमिका करण्याचं ठरवलं, असं राजू शेट्टी म्हणालेत. राजू शेट्टी यांनी ‘राष्ट्र – एक रणभूमी’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील होते.

Raju Shetti
Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

महाविकास आघाडीकडून का उभे राहिले नाहीत?

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये मी सुद्धा होतो. मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा नेता निवडीची जी बैठक झाली त्यात उद्धव ठाकरे यांनी याचे नेतृत्व करावे अशी सूचना छगन भुजबळांनी मांडली होती. त्याला मी अनुमोदन दिले होते. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर नेत्यांना सत्तेची उब आली, आपले खरे रुप दाखवायला त्यांनी सुरुवात केली, असं शेट्टी म्हणाले.

केंद्राच्या कायद्यात राज्याला बदल करता येत नाही. पण, एफआरपीच्या तुकड्या-तुकड्याने देण्याच्या संदर्भात दुरुस्ती महाविकास आघाडीने केली. यावेळी घटक पक्षांची चर्चा करण्यात आली नाही. २०१३ चा भूमीअधिनियम कायदा होता, त्यात मोदींनी दुरुस्ती आणली होती. त्यात सर्व विरोधकांनी याला विरोध केला होता. मी पण विरोध केला होता. मोदींनी तो विषय बासणात गुंडाळला, पण, नंतर महाविकास आघाडीने सक्तीने भूसंपादनाचा कायदा आणला. शेतकऱ्यांना कोर्टात देखील जाता येत नाही. आघाडीने कायदा कोणाला विचारुन केला. हा आमचा आक्षेप होता. त्यामुळे आम्ही ५ एप्रिल २०२१ ला आघाडीसोबत सर्व संबंध तोडले. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.

Raju Shetti
Hatkanangale Lok Sabha : राजू शेट्टींच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात; जाहीर सभेत म्हणाले, हिंदू-मुस्लिम संकटात नाहीत तर..

राजू शेट्टी कोणते मुद्दे घेऊन लोकांकडे जाणार?

मी मतदारसंघात काम केलं आहे. इथे माणसं जोडली आहेत. त्यामुळे मला इथे संधी आहे. चळवळीच्या रेट्यामुळे मी मतदारसंघातील लोकांना उसाला जास्त पैसे मिळवून दिले आहे. दूधाला देखील मतदारसंघात तीन ते चार रुपये जास्त मिळतात. त्यामुळे इथले लोक काहीसे आर्थिकदृष्या स्थिर झाले आहेत. मतदारसंघात चांगल्या शाळा, कॉलेज, हॉटेल दिसून येतात, असं ते म्हणाले.

मुलांच्या शिक्षणावर देखील काम करण्यास सुरुवात केली आहे. आरटीआय शिक्षणासाठी कायदा केला, पण तो सर्वांना परवडणारा नाही. त्यामुळे बँकाने मागेल त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज द्यायला हवं हा मुद्दा मी निवडणुकीत घेतला आहे. सरकार मोठ्या उद्योगपतींना कर्ज देते, मग विद्यार्थ्यांना कर्ज द्यायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला.

मणिपूरमध्ये महिलेची धिंड काढण्यात आली होती. त्यावेळी ७२ तास उपोषण करुन मी पश्चाताप व्यक्त केला आहे. काहीजण संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. याला आमचा विरोध आहे. या संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. शेतकऱ्यांसाठी एक मंडळ तयार व्यायला हवे, तसेच वस्त्र उद्योगातील कामगारांसाठी मंडळ असावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीत जात आहोत,असं शेट्टी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com