esakal | महाराष्ट्रातून आले अन् थेट घरीच गेले...
sakal

बोलून बातमी शोधा

He came from Maharashtra and went home

कोगनोळी टोल नाक्‍यावर नोंदणी करून थेट घर गाठलेल्या 35 जणांना महापालिका व पोलीस प्रशासनने दणका दिला आहे. त्यांना शोधून काढून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. काहींनी कोगनोळी टोल नाक्‍यावर खोटा पत्ता दिल्याचेही उघडकीस आले आहे. अशांना त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून आले अन् थेट घरीच गेले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव : कोगनोळी टोल नाक्‍यावर नोंदणी करून थेट घर गाठलेल्या 35 जणांना महापालिका व पोलीस प्रशासनने दणका दिला आहे. त्यांना शोधून काढून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. काहींनी कोगनोळी टोल नाक्‍यावर खोटा पत्ता दिल्याचेही उघडकीस आले आहे. अशांना त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले आहे. पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा इशारा देऊन सीपीएड मैदानावर येण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्रातून आलेल्या एका दाम्पत्याने खोटी माहिती देऊन दिशाभूल केली होती. पण महापालिकेकडून माहिती मिळाल्यावर कॅम्प पोलोसानी त्या दांपत्याचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण केले. 

महाराष्ट्रातून बेळगावात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कर्नाटकात प्रवेशावेळी त्यांची कोगनोळी येथील टोल नाक्‍यावर त्यांची नोंद होते. त्यांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक घेतला जातो. त्यांना बेळगावात सीपीएड मैदानावर जाण्यास सांगितले जाते. टोल नाक्‍यावर ज्यांची नोंदणी होते त्यांची माहिती तातडीने बेळगावला पाठविली जाते. टोल नाक्‍यावर नोंदणी झालेले व सीपीएड मैदानावर आलेले यांचा ताळमेळ घातला जातो. त्यावेळी थेट घरी गेलेल्यांची माहिती मिळते. 9 मे पासून परराज्यातील विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांना मोठ्या संख्येने बेळगावात प्रवेश देण्यात आला आहे. पण त्यातील 35 जणांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाचे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. पण हे विलगीकरण टाळण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानं शोधून काढण्याची मोहीम महापालिका व पोलिसांनी पूर्ण केली आहे. 
महाराष्ट्र व अन्य तीन राज्यातुन कर्नाटकात येणाऱ्यांवर 31 मे पर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी बेळगावात येणाऱ्यांची संख्या घटली असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली. ज्यांनी आधीच ई पास काढले आहेत त्यांना प्रवेश मिळाला पण त्यांची संख्या कमी होती. त्यामुळे आता परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी सीपीएड मैदानावर सुरू करण्यात आलेला कक्ष बंद केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रवेशबंदी मागे घेतल्यांनातर पुन्हा तो कक्ष सुरू होऊ शकतो. या कक्षाची जबाबदारी महापालिकेकडे होती. चोवीस तास तो कक्ष सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला होता. आता नव्या निर्णयांमुळे त्याना काही काळ विश्रांती मिळणार आहे. 

loading image
go to top