esakal | videoबघा, त्याने ड्युटीसाठी केले सपासप वार 
sakal

बोलून बातमी शोधा

he killed the boss for duty

एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये सिक्‍युरिटीगार्डने सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 

videoबघा, त्याने ड्युटीसाठी केले सपासप वार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : सुटी किंवा रजा न दिल्याच्या कारणावरून बॉसचा खून करण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. नगर एमआयडीसीतही असाच काहीसा प्रकार घडला. ड्युटीसाठी सुरक्षारक्षकाने सुपरवायझरवर कोयत्याने सपासप वार केले. 
एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये सिक्‍युरिटीगार्डने सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

किरकोळ वाद झाला होता
राजाराम नामदेव वाघमारे (वय 48 रा. भिंगार) असे हत्या झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीतील एका मोठ्या कंपनीत ड्युटी देण्यावरून सिक्‍युरिटी गार्ड व सुपरवायझर यांच्यात आज (गुरूवारी) सकाळी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर सिक्‍युरिटीगार्ड गार्ड किरण रामभाऊ लोमटे (रा. बोल्हेगाव) हा तेथून ड्युटीवर न जाता घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर तो घरून कोयता घेऊन आला. त्यानंतर त्याने कंपनीत येऊन सुपरवायझरवर वाघमारे यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या केले. त्यात वाघमारे जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. 

अकस्मात मृत्यूची नोंद
या बाबत डॉक्‍टरांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसांनी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुरु होती. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळताच एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची पोलिसांनी कंपनीत चौकशी केली आहे. या प्रकरणी कंपनीतील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


 

loading image
go to top