निवृत्तीनंतरही कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी ते सज्ज..! 

dinkarrao patil islampur.jpg
dinkarrao patil islampur.jpg
Updated on

इस्लामपूर (सांगली)- सेवानिवृत्तीनंतरही कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात सक्रिय होण्याची इच्छा शाखा अभियंता दिनकरराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसे निवेदन त्यांनी वाळवा पंचायत समिती प्रशासनाकडे दिले आहे. 


सेवानिवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असताना कधी एकदा निवृत्त होतोय अशी अनेकांची मानसिकता असते. परंतु वाळवा पंचायत समितीकडे कार्यरत असणारे आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले शाखा अभियंता दिनकरराव पाटील त्याला अपवाद ठरले आहेत. कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू आहेत. प्रशासनाने सर्वध अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध पदांवर नेमणूका केलेल्या आहेत. त्यानुसार सर्वच अधिकारी, कर्मचारी कामकाज करीत आहेत. यादरम्यान शाखा अभियंता (बांधकाम) या पदावर कार्यरत असणाऱ्या दिनकराव पाटील यांच्याकडे वाळवा तालुक्‍यातील वाटेगांव, भाटवडे, ओझर्डे, रेठरे धरण या गांवांसाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.परंतु श्री. पाटील हे दिनांक 31 मे रोजी वयोमानानुसार जिल्हा परिषद सेवेमधून निवृत्त झाले. परंतु श्री. पाटील यानी एक सामाजिक जबाबदारी म्हणून शासकिय सेवेत कार्यरत असताना कोविड-19 अंतर्गत सोपविण्यात आलेली संपर्क अधिकारी या पदाची जबाबदारी निवृत्तीनंतरही स्विकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांना तसे लेखी निवेदन दिले आहे. श्री. पाटील यांनी कारकिर्दीमध्ये प्रकारच्या निवडणूका, महापूर पंचनामे, अतिवृष्टी पंचनामे यासारख्या कामकाजांमध्ये उल्लेखनिय कामगीरी बजावली आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवेबद्दल कौतूक होत आहे. 

""जबाबदारीचे भान आणि बांधिलकी असणारे शासकीय अधिकारी अपवादाने पाहायला मिळतात. त्यापैकी एक दिनकरराव पाटील आहेत. त्यांच्यामधील हा आदर्श शासनाचा पगार व अन्य लाभ घेणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.'' 
-शशिकांत शिंदे (गटविकास अधिकारी) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com