त्यांना बनायचे होते डॉक्‍टर पण बनले आमदार.. 

GOPICHAND.jpg
GOPICHAND.jpg

झरे (सांगली)- धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्याने राज्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते राज्यभर जल्लोष करीत आहेत. श्री पडळकर यांनी राजकारणात आल्यापासून भरपूर खडतर परिश्रम घेतले. त्याचे आज त्यांना आमदारकीच्या रूपांमध्ये फळ मिळाले. खरे तर त्यांनी डॉक्‍टर बनावे अशी वडिलांची इच्छा होती, परंतू ते आमदार बनले.

 
श्री पडळकर यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा, एक वेळ जिल्हा परिषद, एक वेळा लोकसभा निवडणूक लढली. त्यामध्ये अपयश आले. मात्र थोरले बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत म्हणून उभा केले. त्यामध्ये त्यांना पहिले यश मिळाले होते. बंधूंना समाज कल्याण सभापतीची लॉटरी लागली. त्या माध्यमातून अनेक विकास कामे मतदारसंघात तालुक्‍यात व जिल्ह्यातील काना कोपऱ्यात केली. विकास कामाच्या माध्यमातून पडळकर बंधूंचे नाव सर्वत्र पोहोचले.


गोपीचंद पडळकर यांचे वडील कुंडलिक बाबा पडळकर हे प्राथमिक शिक्षक होते. गोपीचंद हे लहानपणी हुशार व चंचल बुद्धीचे होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांना डॉक्‍टर बनावे. दुर्दैवाने 2004 मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे डोक्‍यावरील छत्र हरवले. त्यामुळे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न अधूरेच राहिले.आर्थिक परस्थिती नसल्याने ऍडमिशन कुठेही मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी बीए करण्याचे ठरवले. ते बी.ए. झाले. वडिलांच्या निधनानंतर आईला मिळणाऱ्या पेन्शनवरती कसेबसे दोघांचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे काय करायचे या विचारात होते. त्यानंतर कंन्स्ट्रक्‍शन व्यवसायांमध्ये उडी मारली. त्यामध्ये त्यांना यश मिळत गेले. त्याचबरोबर त्यांना राजकारणात गोडी वाटू लागली.

धनगर समाजाची संघटना बांधत असताना अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. वादावादी भांडणे अनेक केसेस अंगावर पडल्या. परंतु कोणत्याही दबावाला न डगमगता त्यांनी लढलेल्या संघर्षमय लढाईला आज खऱ्या रूपाने यश मिळाले. वयाच्या 36 व्या वर्षी ते आमदार झाले. दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातील ग. दि. माडगूळकर, अण्णासाहेब लेंगरे, राजेंद्रअण्णा देशमुख यांना आमदारकीची संधी मिळाली. बऱ्याच कालखंडानंतर गोपीचंद पडळकर हे तालुक्‍यातील चौथे आमदार झाले.गोपीचंद आणि ब्रह्मानंद दोन्ही मुले राजकारणामध्ये यशस्वी झाली तरी त्यांची आई हिराबाई कुंडलीक पडळकर ह्या मात्र अजूनही शेतीमध्ये कष्ट करतात. शेती ही मायभूमी आहे मी शेतीच करणार असा त्यांचा हट्ट आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com