आता विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरही

head master in schools also teach few lectures to students decision of education department in belgaum
head master in schools also teach few lectures to students decision of education department in belgaum

बेळगाव : शाळेतील सहशिक्षकांबरोबरच मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्यांना शिकवावे, अशा सूचना शिक्षण खात्याने केल्या आहेत. काही शाळांत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याच्या तक्रारी दाखल झाल्यावर शिक्षण खात्याने ही सूचना केली आहे.

शिक्षक असो वा मुख्याध्यापक त्यांना रोज वर्ग घ्यावे लागतात. मात्र काही शाळांतील मुख्याध्यापक वर्गावर जात नसल्याने सहशिक्षकांना अतिरिक्‍त वर्ग घ्यावे लागतात. तसेच अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्‍त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते. यासाठी मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान १२ तास विद्यार्थ्यांना शिकवावे, अशी सूचना केली आहे. 

मुख्याध्यापकपदी बढती देत असतानाच शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याची सूचना केलेली असते. त्यानुसार मुख्याध्यापकही रोज वर्ग घेत असतात. परंतु, काही शाळांतील मुख्याध्यापकांबाबत तक्रारी दाखल झाल्याने शिक्षण खात्याला पुन्हा एकदा सूचना करावी लागली आहे. अनेक सरकारी शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षक आहेत. त्या शाळांमध्ये एखादा शिक्षक सुटीवर असेल तर मुख्याध्यापकांवर शाळेची जबाबदारी येऊन पडते. तसेच सरकारी शाळांतील शिक्षकांवर इतर कामांचा बोजाही असतो. त्यामुळे सरकारी शाळांतील रिक्‍त जागा भरणे गरजेचे बनले आहे. 

राज्यातील विविध सरकारी शाळांमध्ये १४ हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. दरवर्षी टीईटी घेताना शिक्षक भरतीचे आश्‍वासन दिले जाते. प्रत्यक्षात भरती केली जात नाही. २०२० मध्ये कोरोनाचे संकट आल्याने भरती करण्यात आलेली नाही. मार्चनंतर शिक्षक भरती करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. परंतु, त्याबाबतही पुढे काही हालचाली झालेल्या नाहीत. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com