नियम धाब्यावर :  सांगली पालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार संशयात 

The health department work of Sangli Municipality is in doubt
The health department work of Sangli Municipality is in doubt

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातही महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपल्या भोंगळ कारभाराचा नमुना दाखवून दिला. कचरा कंटेनर आणि फिरते शौचालय दुरुस्तीसाठी ऑनलाईन निविदा मागवताना नियम धाब्यावर बसवून केवळ चार दिवसांची मुदत दिली आहे. शिवाय बाजारात ज्या किंमतीला कंटेनर मिळते तेवढीच किंमत दुरुस्तीसाठी प्रशासनाने देऊ केली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्‍यता आहे.

महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुर्वतयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागामार्फत 37 कंटेनर दुरुस्तीसाठी ऑनलाईन निविदा मागवली आहे. परंतू स्थानिक स्तरावर कंटेनर दुरुस्तीचे काम झाले असते. परंतू महापालिकेने ऑनलाईन निविदा मागवली. ही निविदा 21 मे रोजी प्रसिद्ध केली अन ती भरण्याची मुदत 27 तारखेपर्यंत दिली. यामध्ये एक कंटेनर दुरुस्तीसाठी तब्बल 39 हजार 337 रुपये दर दिला आहे. एकूण 37 कंटेनरसाठी 14 लाख 55 हजार 469 रुपये किंमत दिली आहे.

वास्तविक महापालिका अधिनियमानुसार तीन लाख ते 25 लाखांपर्यंतच्या निविदांसाठी कायद्याने सात दिवस किंवा कामकाजाचे पाच दिवस भरावे लागतात. तारखेनुसार सात दिवस दिसतात. परंतु महापालिकेला 23 ते 25 असे तीन दिवस सुटी असल्याने चारच दिवस अर्जासाठी भरतात. शिवाय कंटेनर दुरुस्तीसाठी ऍटोकॅड डिझाईन तयार करून त्याची उपायुक्तांमार्फत मंजुरी घेण्याची अट घातली आहे. सोबतच अटी-शर्ती ऑनलाईन देण्याऐवजी मुख्यालयात येऊन भेटावे अशी अट घातली आहे. ज्या किमतीत नवीन कंटेनर येतात त्या किंमतीत दुरुस्तीचा घाट घातला आहे. 

स्वच्छतागृह दुरुस्तीचीही निविदाही अशाच पध्दतीने मागविली आहे. प्रत्येकी दहा टॉयलेटचे एकूण सहा युनिट दुरुस्तीसाठी 15 लाख 71 हजार 100 रुपयांची निविदा आहे. त्याचीही ऑनलाईन निविदा काढली आहे. त्याबाबतही अटी-शर्ती, फॉर्मसाठी आरोग्य विभागाच्या मुख्यालयात संपर्क साधावा असेही म्हटले आहे. पण, ऑनलाईन निविदा असेल तर भेटण्याची गरजच काय? एकूणच आरोग्य विभागाच्या या घाईगडबडीच्या कारभाराबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे. 

फेरनिविदा काढू

निविदा प्रक्रियेबाबत तक्रार आली आहे. यात त्रुटी असतील तर त्याची फेरतपासणी करू. यात महापालिकेचे नुकसान असेल तर योग्य ती दुरुस्ती करून फेरनिविदा काढू. यामध्ये कोणाचे इंटरेस्ट असतील तर चालू देणार नाही. प्रशासनातील कोणी यात दोषी असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई करू.

- नितीन कापडनीस, आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com