
-रवींद्र माने
तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील सर्पदंश झालेल्या कावेरी प्रेम चव्हाण या नवविवाहितेस वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. मात्र यातील गंभीर बाब म्हणजे त्यावेळी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही आरोग्य अधिकारीच गैरहजर होते. कावेरी चव्हाण यांच्यावर आरोग्य सेविकांनी प्रथमोपचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.