कपड्यांचे ढीग चिखलात : माणुसकीच्या भिंतीला हवंय हक्‍काचं छत; महापालिकेच्या उपक्रमाची कोरोनामुळे वाताहत

अजित कुलकर्णी
Wednesday, 28 October 2020

सांगली महापालिकेतर्फे दोन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या "माणुसकीची भिंत' या उपक्रमाची बरीच चर्चा झाली. पण सध्या मात्र ही भिंत चिखल, पावसात रुतलीय.

सांगली : महापालिकेतर्फे दोन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या "माणुसकीची भिंत' या उपक्रमाची बरीच चर्चा झाली. पण सध्या मात्र ही भिंत चिखल, पावसात रुतलीय. कोरोना संसर्गाच्या भितीने ही भिंत सध्या दुर्लक्षित आहे. चिखल, गाळ तिच्या वाट्याला येत असल्याचे चित्र आहे. "जुने असेल ते द्या, हवे असेल ते न्या' ही संकल्पना ठेवून सुरु झालेल्या या उपक्रमाची वाट लागली आहे. महापालिकेने या उपक्रमात सातत्य राखण्यासाठी हक्‍काचं छत उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आहे. 

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा ओळखून अनेक उपक्रम राज्यभर सुरु असतात. त्याप्रमाणे माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राज्यात अनेक ठिकाणी सुरु झाला. तसा सांगलीतही महापालिकेने पुढाकार घेत डॉ. जी. ए. देशपांडे (त्रिकोणी) उद्यानानजीक शाळेच्या परिसरात या उपक्रमाला सुरुवात केली.

जुने झालेले मात्र सुस्थितीत असणारे वापरण्याजोगे कपडे इतरत्र टाकून देण्यापेक्षा येथे आणावेत, जेणेकरुन गरजूंना ते उपयोगी येतील, ही संकल्पना होती. स्त्री, पुरुष तसेच लहान मुले अशा तीन विभागात भिंतीला अडकवलेले कपडे जमा करण्यासाठी तसेच ते नेण्यासाठीही चांगला प्रतिसाद मिळत होता. 

काही दिवस हा उपक्रम उत्तमपणे चालला. रस्त्यावर भटकणारे, बेवारस, अनाथ, भिकारी, दिव्यांगाना या उपक्रमाचा मोठा आधार होता. विशेषत: थंडीच्या दिवसात येथील कपड्यांचा उठाव मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र सहा महिन्यांपूर्वी कोरोनाचे आलेले संकट या उपक्रमाला छेद देणारे ठरत आहे.

हस्तांदोलन बंदी, सोशल डिस्टन्स, मास्कची सक्‍ती असलेल्या काळात जुने कपडे वापरणे म्हणजे मोठी "रिस्क' वाटत आहे. गेल्या सहा महिन्याच्या काळात अपवाद Heaps of clothes in the mud: a roof over the wall of humanity; The corona of the municipal enterprise is windyवगळल्यास ही भिंत देणाऱ्या तसेच नेणाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहे. महापालिका प्रशासनाने या उपक्रमाचा बोऱ्या वाजण्यापूर्वी हक्‍काची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heaps of clothes in the mud: a roof over the wall of humanity; The corona of the municipal enterprise is windy