संततधार पावसाची जोरदार बॅटिंग; येरळा नदीवरील पूल पाण्याखाली 

संतोष कणसे 
Monday, 17 August 2020

​कडेगाव : तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने येरळा नदीला पूर आला आहे.

कडेगाव : तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने येरळा नदीला पूर आला आहे.पुराच्या पाण्याने नदीवरीलरामापूर- कमळापूरदरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चिंचणी-वांगी पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. 

तालुक्‍यात सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्‍यातील नद्या, नाले ओढ्यांच भरून वाहत आहेत. त्यामुळे रामापूर-कमळापूर रस्त्यावर येरळा नदीवरील पुलांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. येरळा नदीला पूर आला आहे. याशिवाय नांदनी नदीला पूर आला आहे . चिंचणी तलावातुन मोठा विसर्ग सुरू आहे. नांदनी नदीचे सोनहीरा ओढ्याचे पाणी येरळा नदीत जाते यामुळे रामापूर कमळापूर पूल पाण्याखाली गेला आहे. 
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमरापूर (ता. कडेगाव) गावानजीकचा नांदणी नदीवरील पूल पाण्याची पातळी वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतुक चिखली-कडेपूर मार्गे वळविण्यात आली आहे. 

चिंचणी (ता.कडेगाव) येथील 157 दशलक्ष घनफुट क्षमतेचा तलाव तुडुंब भरला आहे.तुडुंब भरलेल्या तलावाच्या सांडव्यातील 36 स्वयंचलित दरवाजांवर पाण्याचा दाब वाढला.यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांडव्यातील एक दरवाजा चार फुटाणे उचलुन शंभर कुसेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू केला .याशिवाय दोन स्वयंचलीत दरवाजे पाण्याच्या प्रचंड दाबाने उघडले यामुळे सांडव्यातून एक हजार कुसेक्‍सहुन अधिक पाणी प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले आहे यामुळे प्रशासनाने सोनहिरा खोऱ्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे . तर सोनहीरा खोऱ्यातील आसद पुलावरून पाणी वाहत आहे.

याशिवायचिंचणी, अंबक, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव आदी गावालगत असलेल्या सोनहीरा ओढयाच्या असणाऱ्या पुलांवरून पाणी वाहण्याची भीती निर्माण झाली आहे. तर कोतमाई ओढ्यालाही पूर आल्याने कडेगाव शहरांतील नागपूर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने येथील वाहतुक काही काळ बंद होती. 

तालुक्‍यातील रामापूर-कमळापूर पूलावरून पाणी वाहत असल्याने येथील रस्ता बंद करण्यात आला आहे.कोणीही नागरिकांनी किंवा वाहनधारकांनी पूल ओलांडून पुढे जाण्याचे धाडस करू नये. 
- डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार कडेगाव 

 
संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain battering; The bridge over the Yerla River is under water