चांदोलीत परिसरात दुसऱ्या दिवशी धुवॉधार पाऊस , काखे-मांगले पुल पाण्याखाली 

विष्णू मोहिते
Wednesday, 5 August 2020

सांगली, ः जिल्ह्यात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तर चांदोली परिसरात पंधरवड्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. चांदोली परिसरात धुवॉधार पाऊस सुरु आहे. चांदोली धरणात गेल्या 24 तासात पाणीसाठा 23.92 टी. एम. सी. वरुन 26.33 टी. एम. सी. झाला आहे. 2.41 टी. एम. सी. ने पाणीपुरवठा वाढला आहे. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात 6.08 टी. एम. सी.ने पाणीसाठा वाढला आहे. प्रतिवर्षी प्रमाणे जिल्ह्यात काखे-मांगे पुल बंद वाहतुकीसाठी बंद झाला आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आज धुवॉधार पाऊस ुसुरु आहे. चांदोली धरण परिसरात आज सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. काल 71 मिलिमिटर तर आज 140 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. चांदोली धरणात गेल्या 24 तासात 2.41 टीएमसीने वाढ झाली असून 26.33 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. 70.65 टक्के धरण भरले आहे. इस्लामपूर, वाळवा, पलूस, भिलवडी, आष्टा परिसरात संततधार तर मध्य भागातील तासगाव, मिरज तालुक्‍यातही चांगला पाऊस होत आहे. पूर्व भागात हलका पाऊस सुरु आहे. 

कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात धुवॉधार पाऊस पडतो आहे. कोयना येथे 214 मिलिमिटर, नवजाला 299 मिलिमिटर, महाबळेश्‍वरला 308 असा जोरादार पाऊस पडला आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात सहा टी. एम. सी. ने पाणीसाठा वाढला असून 60.28 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. 
 
धरण व पाणीसाठा ( टीएमसी) असा 
( सकाळी 8 वाजता) 
वारणा- 26.33 
कोयना- 68.28 
.................. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Chandoli area the next day, Kakhe-Mangle bridge under water