Maharashtra RainSakal
पश्चिम महाराष्ट्र
Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रात जोरदार सरी, नाशिक, मराठवाड्यातही मुसळधार पाऊस
Pune Weather : राज्याच्या पश्चिम भागात हवामान खात्याच्या अंदाजानुसार जोरदार पाऊस कोसळला असून, रस्त्यांवर पाणी साचले तरीही शेतीसाठी लाभदायक ठरल्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत.
पुणे/सातारा : हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याप्रमाणे आज राज्याच्या पश्चिम भागात सुमारे तास ते दीड तास जोरदार पाऊस कोसळला. अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. मराठवाड्यासह नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. दुपारच्या उष्म्यानंतर संध्याकाळी आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या या पावसाने शेतकरी मात्र सुखावला आहे.